
रांजणवाडी हा डोळ्यांचा एक आजार असून प्रामुख्याने बॅक्टेरिया होत असतो. यामध्ये डोळ्यांच्या पापणीच्या ठिकाणी बारीक पुळी येते. त्या पुळीमुळे पापणीच्या ठिकाणी सूज येणे, खाज सुटणे किंवा वेदना होणे सुरू होते. याठिकाणी रांजणवाडी वरील उपाय यांची माहिती दिली आहे.
रांजणवाडी उपाय :
धने –
एक तासासाठी धने स्वच्छ पाण्यात भिजवत ठेवावेत. त्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे. ह्या गाळलेल्या धन्याच्या पाण्याने आपले डोळे धुवावेत. या उपायाने रांजणवाडीतील सूज व वेदना कमी होण्यास मदत होते.
कोरपडीचा गर –
कोरपडीची पाने लांबलचक कापून त्यातील गर रांजणवाडीच्या ठिकाणी लावावा. यामुळे लालसरपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.
पेरूची पाने –
रांजणवाडीमुळे होणारी वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी पेरूची पाने खूप उपयोगी पडतात. यासाठी गरम पाण्यात पेरूची पाने भिजवून ती आपल्या डोळ्यावर 10 मिनिटे ठेवावीत.
एरंडेल तेल –
एरंडेल तेलात कापसाचा बोळा भिजवून तो रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा. या उपायामुळेही रांजनवडी दूर होण्यास मदत होते.
लवंग –
लवंग पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीच्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा लावावा. लवंगमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असल्याने रांजणवाडीमध्ये हा उपाय उपयुक्त ठरतो.
लसूण –
लसणाची पाकळी सोलून त्याचा तुकडा करून ती रांजणवाडीवर लावावी. यामुळे रांजणवाडी कमी होण्यास मदत होते. लसूण खाण्याचे फायदेही वाचा..
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.
नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी उपाय – Stop unwanted pregnancy in Marathi