रांजणवाडी वर उपचार – रांजणवाडीवरील घरगुती आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

रांजणवाडीत जंतुसंसर्ग होऊन डोळ्यांच्या पापणीला बारीक फोड येतो. त्यामुळे त्याठिकाणी सूज, वेदना आणि जळजळ होत असते. सहसा एक आठवड्यात हा त्रास कमी होत असतो. रांजणवाडी वर उपचार याची माहिती खाली दिली आहे.

रांजणवाडीवर औषध उपचार :

रांजणवाडी या त्रासासाठी एंटीबैक्टीरियल क्रीम (antibiotic ointments) लावणे उपयोगी ठरते. तर वेदना कमी करण्यासाठी acetaminophen किंवा ibuprofen हे घटक असणाऱ्या गोळ्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

कोणती काळजी घ्यावी..?

रांजणवाडीची फोडी बोटाने दाबून फोडू नये. कारण असे करण्यामुळे त्याठिकाणी जखम होऊ शकते तसेच तेथील बॅक्टेरियल इन्फेक्शन इतर ठिकाणीही पसरण्याची व त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते.

रांजणवाडीवरील घरगुती आयुर्वेदिक उपचार :

• एरंडेल तेलात भिजलेला कापसाचा बोळा रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा.
• लवंग पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीच्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा लावावा.
• गरम पाण्यात भिजलेली पेरूची पाने 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवावी.
• कोरपडीचा गर रांजणवाडीच्या ठिकाणी लावावा. 
• लसूण पाकळीचा तुकडा करून तो रांजणवाडीवर लावावा.

Ranjanwadi tratment & solution in Marathi.