ranjanwadi information in marathi.
रांजणवाडी म्हणजे काय?
रांजणवाडी हा डोळ्यांचा एक आजार असून याला वैद्यकीय भाषेत stye असे म्हणतात. यामध्ये डोळ्यांच्या पापणीच्या ठिकाणी बारीक फोड किंवा पुळी येते. त्या पुळीमुळे पापणीच्या ठिकाणी दुखणे, सूज येणे, पू होणे असा त्रासही होऊ शकतो.
रांजणवाडी का होते, रांजणवाडी कारणे :
डोळ्यांची स्वच्छता न ठेवणे हे रांजणवाडी होण्याचे प्रमुख कारण असते. याशिवाय डोळ्यांच्या पापणीला असलेल्या केसाच्या खालचे छिद्र बंद होऊन जंतूसंसर्ग झाल्याने पापणीच्या ठिकाणी पुळी येत असते. तसेच सतत डोळे चोळणे, चष्म्याचा बदलता नंबर, नियमितपणे चष्मा न वापरणे यामुळेही रांजणवाडी होऊ शकते.
रांजणवाडी वर घरगुती उपाय –
लवंग –
लवंग पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीच्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा लावावा. लवंगमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असल्याने रांजणवाडीमध्ये उपयुक्त ठरते.
एरंडेल तेल –
एरंडेल तेलात भिजलेला कापसाचा बोळा रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा. यांमुळेही रांजणवाडीची समस्या दूर होण्यास मदत होते.
लसूण –
लसणाची पाकळी सोलून त्याचा तुकडा करून ती रांजणवाडीवर लावावी. यामुळे रांजणवाडी कमी होण्यास मदत होते. मात्र लसूणमुळे त्याठिकाणी थोडी जळजळ होण्याची शक्यता असते.
Stye Symptoms and Treatments, Ranjanwadi eye disease home remedies.