रांजणवाडीमध्ये डोळ्याच्या पापणीला बारीक लालसर पुळी किंवा फोड येतो. त्यामुळे त्याठिकाणी सूज, वेदना आणि जळजळ होत असते. हा त्रास बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होत असतो. डोळ्याला रांजणवाडी आल्यास काय उपाय करावेत याची माहिती येथे डॉ सतीश उपळकर यांनी दिली आहे.
रांजणवाडी आल्यावर उपाय :
धने –
एक तास धने स्वच्छ पाण्यात भिजवत ठेवावेत. त्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे. ह्या गाळलेल्या धन्याच्या पाण्याने आपले डोळे धुवावेत. धण्यामध्ये फोडातील सूज व वेदना कमी करणारे घटक असतात.
एरंडेल तेल –
एरंडेल तेलात भिवलेला कापसाचा बोळा रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा. हा आयुर्वेदिक उपाय रांजणवाडी आल्यावर खूप उपयोगी ठरतो.
कोरफडीचा गर –
कोरफडीच्या पानातील गर रांजणवाडीच्या ठिकाणी लावावा. यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.
लवंग –
लवंग पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीच्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा लावावा. लवंगमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असल्याने रांजणवाडी आल्यावर हा उपायही उपयुक्त ठरतो.