Dr Satish Upalkar’s article about Proteins health benefits and food list in Marathi.

प्रोटीन म्हणजे काय ?

कर्बोदके प्रथिने आणि मेद अशी तीन मुख्य पोषक घटक आहेत. यातील प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स हे असून शरीर बांधणीचे मुख्य कार्य प्रोटीन्स करीत असते. प्रथिने ही अमिनो आम्लांनी बनलेली असतात. ती एकमेकांशी साखळीसारखी जोडलेली असतात. अमिनो आम्लांचे 20 विविध प्रकार आहेत. शरीराला प्रोटिन्स (प्रथिने) ही शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही आहार घटकातून मिळतात.

प्रथिनांचे कार्य –

  • शरीराची झीज भरुन काढण्याचे महत्वपुर्ण कार्य प्रथिनांद्वारेच केले जाते.
  • स्नायूंच्या मजबूतीसाठी प्रोटीन महत्त्वाचे असते.
  • प्रथिनातून शरीराला उर्जा, उष्मांक मिळतो. ती उर्जा कार्य करण्यास उपयोगी पडते.
  • प्रथिनांद्वारे रक्तातील विविध प्रथिनांची निर्मिती करतात. जसे Albumin, globulin, pro-thrombin इ.
  • रोगप्रतिकारक क्षमता प्रथिनांमुळे निर्माण होते.
  • विविध पाचकस्त्राव, हॉर्मोन्सची निर्मिती करणे.
  • शरीराची वाढ करणे यासारखी कार्ये प्रथिनांद्वारे केली जातात.

प्रोटीन युक्त आहार लिस्ट –

प्रोटीन युक्त मांसाहारी पदार्थ लिस्ट –

अंडी, मांस, मासे, चिकन, कोळंबी, खेकडा इत्यादी मांसाहारी पदार्थात उच्च दर्जाचे प्रोटीन मुबलक प्रमाणात असते.

प्रोटीन युक्त शाकाहारी पदार्थ लिस्ट –

दूध व दही, पनीर, चीज असे दुग्धजन्य पदार्थ, डाळी, सोयाबीन व सोया प्रोडक्ट्स, मशरूम, बीन्स, बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता, शेंगदाणे, जवस, ओट्स अशा शाकाहारी पदार्थात प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते.

प्रोटीनची दैनंदिन गरज –

पूर्ण वाढ झालेल्या पुरुषांना दररोज 56 ग्रॅम तर स्त्रीला दररोज 46 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. तर गर्भावस्था आणि स्तनपान काळामध्ये स्त्रियांना 60 ते 67 ग्रॅम प्रथिनांची दररोज गरज असते.

वयानुसार दररोज शरीरासाठी गरजेचे असणाऱ्या प्रोटीन्स चे प्रमाण –

  • 1 ते 3 वर्षाच्या बाळासाठी – दररोज 13 ग्रॅम प्रोटीन
  • 4 ते 8 वर्षाच्या मुलांसाठी – दररोज 19 ग्रॅम प्रोटीन
  • 9 ते 13 वर्षाच्या मुलांसाठी – दररोज 34 ग्रॅम प्रोटीन
  • 14 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी – दररोज 46 ग्रॅम प्रोटीन
  • 19 वर्षावरील पुरुषांसाठी – दररोज 56 ग्रॅम प्रोटीन
  • 19 वर्षावरील स्त्रियांसाठी – दररोज 46 ग्रॅम प्रोटीन
  • गरोदर स्त्रियांसाठी – दररोज 60 ग्रॅम प्रोटीन
  • स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी – दररोज 67 ग्रॅम प्रोटीन

अतिरिक्त प्रमाणातील प्रथिने शरीरात चरबीच्या स्वरुपात साठवली जातात. यासाठी पुरेशा व योग्य प्रमाणातच प्रथिनांचे सेवन करावे. जास्त प्रोटीन असलेले पदार्थ खाल्यामुळे वजन अधिक वाढते.

हे सुद्धा वाचा – मांसपेशी बळकट करण्यासाठी घ्यायचा आहार जाणून घ्या..

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

In this article information about Proteins health benefits & Food list in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...