प्रोस्टेटायटिसमध्ये कोणकोणती लक्षणे जाणवतात

5451
views

Prostatitis symptoms in Marathi

प्रोस्टेटायटिस लक्षणे –
◦ पौरुषग्रंथीच्या ठिकाणी सुज येते. प्रोस्टेटचा आकार वाढतो.
◦ ताप येणे.
◦ जननप्रदेशी वेदना होणे,
◦ अंगदुखी, पाठदुखी,
◦ सकष्ट वेदनायुक्त मुत्रप्रवृत्ती
◦ मुत्रत्यागावेळी मुत्र उशीरा उतरणे,
◦ मुत्रधार कमी होणे, थांबुन थांबुन मुत्रप्रवृत्ती होणे,
◦ मुत्र पुर्णतः विसर्जित होत नाही. मूत्राशयातच अधिक काळापर्यंत पडून राहते यामुळे किडन्यांवर परिणाम होऊन मुत्रनिर्मीतीवर परिणाम होतो.
◦ शरिरातून मुत्र वेळोवेळी बाहेर न गेल्यामुळे युरिया सारख्या अपायकारक घटकांची शरीरात, रक्तात वाढ होते त्यामुळे युरीमियाची स्थिती उत्पन्न होते.
◦ प्रोस्टेट चा आकार वाढल्याने त्याचा दाब मुत्रमार्गावर पडतो.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.