प्रोस्टेटला सूज येणे – Prostatitis :

प्रोस्टेटायटिसमध्ये प्रोस्टेट ग्रंथीला सुज आलेली असते तसेच त्याचा आकारातही वाढ झालेली असते. प्रोस्टेट ग्लॅण्ड म्हणजेच पौरुषग्रंथी ही पुरुषांमध्ये असते आणि ती ग्रंथी जननक्रियेमध्ये सहाय्यक ठरत असून ती मुत्राशयाच्या खाली स्थित असते.

प्रोस्टेट ग्लॅण्ड ही मूत्रवहन संस्थेत असते. मूत्राशयाच्या खालच्या बाजूस आणि शरीराबाहेर लघवी टाकण्याचं काम करणाऱ्या मूत्रवाहिकेच्या भोवती ही ग्लॅण्ड असून तिचा बाहेरचा भाग गुदद्वाराच्या वरच्या बाजूस असतो. या ग्लॅण्डचे वजन 15 ते 17 ग्रॅम इतकं असून तिचा आकार छोट्या चेस्टनट फळासारखा असतो. प्रोस्टेट ग्लॅण्डमधून निघणारे स्त्राव शुक्राणुंमध्ये मिसळून वीर्य तयार होत असते.

प्रोस्टेटला सूज येण्याची कारणे (Prostatitis causes) :

वयोवृद्ध पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची उत्पत्ती कमी झाल्याने 50 वर्षानंतर सामान्यतः पौरुषग्रंथीच्या आकारात वाढ झालेली आढळते. अशावेळी प्रामुख्याने प्रोस्टेट ग्रंथीला सूज येत असते.

मुत्रपथातील जीवाणू संक्रमणामुळे (इन्फेक्शन) पौरुषग्रंथीला सुज प्रामुख्याने येते. मुत्रातील जीवाणू Urethra द्वारे प्रोस्टेटमध्ये प्रवेश करतात. यामुळे प्रोस्टेट संक्रमित होते आणि त्याठिकाणी सुज येते. तसेच प्रोस्टेटच्या आकारातही वाढ होते.

प्रोस्टेटचा आकार वाढल्याने त्याचा दाब मुत्राशयातून मुत्राचे वहन करणाऱ्या Urethra वर पडतो. त्यामुळे लघवी करताना वेदना होतात. लघवी शरीराबाहेर टाकली जात नाही.

प्रोस्टेटायटिसची लक्षणे (Prostatitis symptoms) :

  • पौरुषग्रंथीच्या ठिकाणी सुज येते.
  • प्रोस्टेटचा आकार वाढतो.
  • ताप येणे.
  • ‎लघवीच्या ठिकाणी वेदना होणे,
  • अंगदुखी, पाठदुखी,
  • लघवी करताना प्रचंड वेदना होतात,
  • ‎मुत्रत्यागावेळी मुत्र उशीरा उतरणे,
  • ‎मुत्रधार कमी होणे, थांबुन थांबुन मुत्रप्रवृत्ती होणे,
  • ‎मुत्र पुर्णतः विसर्जित होत नाही. मूत्राशयातच अधिक काळापर्यंत पडून राहते यामुळे किडन्यांवर परिणाम होऊन मुत्रनिर्मीतीवर परिणाम होतो.
  • ‎शरिरातून मुत्र वेळोवेळी बाहेर न गेल्यामुळे युरिया सारख्या अपायकारक घटकांची शरीरात, रक्तात वाढ होते त्यामुळे युरीमियाची स्थिती उत्पन्न होते.
  • ‎प्रोस्टेट चा आकार वाढल्याने त्याचा दाब मुत्रमार्गावर पडतो.

प्रोस्टेटायटिसचे निदान :

प्रोस्टेटायटिसच्या निदानासाठी रक्त व लाघवीची तपासणी केली जाते तसेच खालील तपासण्या करणे गरजेचे असते.

PSA तपासणी –
प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढत्या वयामुळे प्रोस्टेट वृद्धी, प्रोस्टेट कैन्सर होण्याची अधिक शक्यता असते यासाठी Prostate Specific Antigen (PSA test)नियमित वर्षातून एकदा करुन घ्यावी. पन्नास वर्षानंतर दरवर्षी प्रोस्टेट ग्लॅण्डची डॉक्टरांकडून तपासणी करावी. पुरुषांना आवश्यक अशा वैद्यकीय तपासणी कोणत्या आहेत ते जाणून घ्या..

ज्यांचं प्रोस्टेट वाढीचं ऑपरेशन झालेलं असतं, अशांनाही भविष्यात प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो. म्हणून त्यांनीही नियमित चेकअप करावं. लघवी होण्यात कुठलाही अडथळा किंवा बदल यांची वेळीच दखल घ्यावी. प्रोस्टेट कॅन्सर हा हळूहळू वाढणारा असतो. तो प्राथमिक अवस्थेत लक्षात आला तर वेळीच रोखू शकतो.

प्रोस्टेट सुजणे यावरील उपचार (Prostatitis treatments) :

प्रोस्टेटला सूज आल्यास त्यावर अँटीबायोटिक औषधे, वेदनानाशक औषधांद्वारे यावर उपचार केले जातात. अँटीबायोटिक उपचारांमुळे बॅक्टेरिया दूर होऊन प्रोस्टेटायटीस आजार पूर्णपणे बरा होतो.

Read Marathi language article about Prostatitis Symptoms, Causes, Diagnosis and Treatments.Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 14, 2024.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.