आपल्या शरीरात वाढत्या वयानुसार मेलेनिनची निर्मिती कमी होत जाते त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. मात्र बर्‍याच तरुण-तरुणींचे अगदी कमी वयातही केस पांढरे होऊ लागतात. वेळेआधी केस पांढरे होण्यासाठी आपली चुकीची जीवनशैली जबाबदार असते.

अयोग्य आहार घेणे, ताणतणाव, प्रदूषण, धूम्रपान सारखी व्यसने यासर्वांचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबर केसांवरही होत असतो. यासाठी येथे लवकर केस पांढरे न होण्यासाठी काय करावे, कोणती काळजी घ्यावी व त्यावर काय उपाय करावेत याची माहिती सांगितली आहे.

केस पांढरे होऊ नयेत यासाठी काय करावे..?

योग्य आहार घ्या..
शरीरामध्ये प्रोटीन, लोह, विटामिन बी12 अशा पोषक तत्वांची कमतरता असल्यास, केस पांढरे होतात. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, विविध फळे यांचा समावेश करा. प्रोटीनयुक्त आहारासाठी दूध, दुधाचे पदार्थ, कडधान्ये, बदाम, अक्रोड, मासे यांचा समावेश करा. तसेच दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

चुकीच्या आहारापासून दूर राहा..
केस पांढरे होऊ नयेत यासाठी जास्त खारट पदार्थ खाऊ नयेत. तसेच फास्टफूड, जंकफूड, तळलेले पदार्थ, स्नॅक्स वगैरे सतत खाणे टाळावे. याशिवाय चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात पिण्याचे टाळावे. आणि मुखु म्हणजे धुम्रपान, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.

केसांची काळजी घ्या..
केसांना नेहमी स्वच्छ धुवावेत. यामुळे केसांना चिकटलेली धूळ, मळ निघून जाते. तसेच केस नेहमी कंगव्याने विंचरले पाहीजेत. जास्त गरम पाण्याने केस धुवू नयेत. तसेच बाजारातील नवनवीन केमिकलयुक्त हेअर प्रोड्क्टसचा आपल्या केसांवर वापर करणे टाळावे.

लवकर केस पांढरे न होण्यासाठी उपाय :

• आवळा असलेल्या तेलाचा वापर करावा.
• केस धुण्यापूर्वी केसांना कोरफडीचा गर लावून मसाज करावा.
• कडीपत्ता तेलात उकळून ठेवावा. हे कडीपत्ता असलेले तेल केसांना दररोज लावल्यास पांढऱ्या केसांची समस्या दूर होते.
• दह्यामध्ये काळी मिरीची पावडर आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण एकत्र करून ते पांढऱ्या केसांवर लावल्यास फायदा होतो.
• लिंबू रस घातलेले खोबरेल तेल केसांना लावणेही पांढरे केसांवर उपयुक्त ठरते.
• माक्याचे आयुर्वेदिक तेल केसांसाठी वापरावे.

How to prevent white hair in early age marathi information.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...