जोखमीचे गरोदरपण

1686
views

गरोदरपणात विशेष काळजी केव्हा घ्यावी लागते..?

  • गर्भावस्थेची पहिलीच वेळ असल्यास विशेष काळजी घ्यावी लागते.
  • मातेचे वय 35 वर्षांहून अधिक असेल तर, विशेष काळजी घ्यावी लागते. गरोदर मातेचे वय जर 30-35 च्या पुढे असेल तर गरोदरपण आणि बाळंतपण गुंतागुंतीचे होते. नैसर्गिक प्रसुती न होणे, तातडीच्या शस्त्रक्रियेची जरुरी लागणे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. यासाठी मूल होण्याचे स्त्रीचे वय 20 ते 30 च्या दरम्यान असावे.
  • मातेचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर, विशेष काळजी घ्यावी लागते . शारीरिक वाढ व मानसिक वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे दूधही पुरेसे येत नाही. बाळाला वाढवायलाही अडचणी निर्माण होतात. म्हणून मुलीचे वय जोपर्यंत 18 वर्ष होत नाही, तोपर्यंत मुलीचा विवाह करू नये व तिच्यावर गरोदरपणही लादू नये.
  • आधीचे मुल 3 वर्षांपेक्षा लहान असेल तर विशेष काळजी घ्यावी लागते.
  • तीन मुलांनंतरचे गरोदरपण धोकादायक ठरू शकते. वरचेवर होणाऱ्या बाळंतपणामुळे मातेची तब्येत प्रत्येकवेळी अधिकाधिक ढासळत जाते व बाळंतपणात गुंतागुंत निर्माण होते.
  • उंची 4 फुट 10 इंचापेक्षा कमी असेल,, वजन 70 किलो पेक्षा जास्त असेल तर,
  • जुळे होण्याची शक्यता असेल, मूल आडवे किंवा पायाळू असेल तर,
  • पूर्वीचे सिझेरियन झालेले असेल तर,
  • आईला काही गंभीर आजार असेल तर,
  • मागिल प्रसुतीच्या इतिहासावरुन जसे कठीन प्रसव, समस्यापूर्ण प्रसुती झाल्यास, गर्भपात झाल्यास, अकाली प्रसव, अतिपक्व प्रसव किंवा प्रसुतीवेळी बालकाचा मृत्यु होणे असा गर्भिणीचा मागिल इतिहास असल्यास त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते.

 

अशावेळी गरोदरपण हे जोखमीचे समजले जाते, त्यामुळे अशावेळी विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच रक्तदाब वाढलेला असणे, अंगावरून अधिक रक्तस्त्राव होणे, पोटात दुखणे, डोके खूप दुखणे, पायावर सूज असणे इ. लक्षणे असतील तरीही अधिक काळजी घ्यावी लागते व लगेच डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.