प्रेग्नन्सी मराठी पुस्तक – Pregnancy Marathi Book :

गर्भावस्थेपासून ते बाळाच्या देखभालीपर्यंत सर्व माहिती एकाचठिकाणी ‘प्रेग्‍नेंसी मराठी’ या पुस्तकातून दिली आहे. यामध्ये गर्भावस्थेसंबंधी शंकां आणि त्यांचे निरसण सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेतून केले आहे. गर्भावस्था, गरोदरपणातील समस्या, बाळंतपण, बालसंगोपण आणि बाळाच्या आरोग्य समस्या अशा पाच मुख्य विभागामध्ये पुस्तकाची मांडणी केली आहे.

विभाग 1 : प्रेग्नन्सी (गरोदरपण विभाग) –
यामध्ये गर्भावस्थेची लक्षणे, प्रेग्‍नेंसी कैलेंडर, गर्भावस्थेत कोणता आहार घ्यावा, गरोदरपणातील तपासणी, गर्भावस्थेतील देखभाल व सूचना, गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स, जोखमीचे गरोदरपण अशी सर्व माहिती येथे दिली आहे.

विभाग 2 : गरोदरपणातील समस्या –
गर्भावस्थेत होणाऱ्या सर्व समस्या व त्रास यांची माहिती व अशावेळी गरोदर स्त्रीने कोणती दक्षता व काळजी घ्यावी यासंबंधी माहिती येथे दिली आहे.

विभाग 3 : बाळंतपण विभाग –
यामध्ये डिलिव्हरीविषयी माहिती, डिलिव्हरीची तारीख, अकाली प्रसुती का होते, प्रसव कळा कशा ओळखाव्या, बाळंतपणातील तयारी, सिझेरियन पद्धत डिलीव्हरी, बाळांतपणातील टाके, तसेचं बाळंतपणानंतर घ्यावयाचा आहार व काळजी याची माहिती दिली आहे.

विभाग 4 : बालसंगोपण विभाग –
यामध्ये नवजात बालकाची देखभाल कशी घ्यावी, नवजात बालकांसाठी स्तनपान महत्व, नवजात शिशुचा आहार, कसा असावा बाळाचा वरचा आहार? बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे, लसीकरण वेळापत्रक याविषयी सर्व माहिती दिली आहे.

विभाग 5 : बाळाच्या आरोग्य समस्या –
लहान बाळास होणारे विविध आजार व घ्यावयाची काळजी याची माहिती याठिकाणी दिली आहे.

‘प्रेग्नन्सी मराठी’ हे eBook असून यात गरोदरपण, बाळंतपण पासून ते बाळाची काळजी कशी घ्यावी याची माहिती तज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. आजच ‘प्रेग्नन्सी मराठी’ हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.