प्रेग्‍नेंसी कैलेंडर

11319
views

प्रेग्‍नेंसी कैलेंडरच्या सहाय्याने आपल्या गर्भाच्या वाढीसंबंधी जाणून घ्या..
गर्भधारणा ही स्त्री अंडाणु आणि पुरूष शुक्राणुच्या एकत्रित मिलनाने होते. स्त्रीबीज व शुक्रजंतू यांचा सफल संयोग होऊन बीज तयार होते. नंतर त्याचा जवळजवळ तीन दिवस प्रवास सुरू असतो. साध्या नजरेला न दिसणारे हे गर्भबीज 4 इंच लांबीच्या गर्भनलीकेतून प्रवास करीत गर्भाशयात प्रवेश करते. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाशयात भ्रूणचा (गर्भाचा) विकास होण्यास सुरवात होते.
गर्भावस्थेत गर्भाचा विकास नऊ महिन्यापर्यंत विविध टप्याने होत असतो.

गर्भावस्थेचे मुख्यत: तीन टप्पे करता येतील.

  • पहिला सत्र First Trimester – (1 ते 3 महिन्याचा काळ)
  • दुसरे सत्र Second Trimester – (4 ते 6 महिन्याचा काळ)
  • तीसरे व अंतिम सत्र Third Trimester – (7 ते 9 महिन्याचा काळ)

गर्भावस्था कैलेंडरच्या सहाय्याने गर्भाचा विकास आणि स्थिति समजण्यास मदत होते. पहिल्या ‍‍ट्राईमेस्टर मध्ये एक ते तीन महिने, दूसऱ्या ट्राईमेस्टर मध्ये चार ते सहा महिने आणि तीसऱ्या ट्राईमेस्टर मध्ये सात ते नऊ महिने असतात.

 

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

पहिला सत्र First Trimester – (1 ते 3 महिन्याचा काळ) :

पहिला महिना –
गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात मासिक पाळी येणे बंद होईल. आता आपण गर्भवती असल्याने स्वतःची योग्य काळजी घ्या. अवजड वस्तू उचलणे, थकवा आणणारी कामे करणे टाळले पाहिजे. पौष्टीक व सकस आहार घ्या.
दूसरा महीना –
गर्भधारणेच्या दूसऱ्या महिन्यामध्ये बाळाच्या पेशींचा वस्तुमान विकास होतो. या प्रक्रियेत पेशींमध्ये विविध प्रकारांमध्ये भाग पडू लागतात. हा गर्भ नाळेद्वारे आईबरोबर जोडला जातो. त्यातून त्याला पोषण ग्रहण करता येते, नाळेमुळे गर्भ आणि गर्भवती एकमेकांशी जोडलेले असतात. या महिन्यामध्ये गर्भाचे हृद्य विकसित होऊ लागते त्यामुळे या महिन्यात विशेष सावधानी घेणे आवश्‍यक असते.

तीसरा महिना –
तीसऱ्या महिन्यामध्ये गर्भाच्या हाडांचा व कानाचा विकास होऊ लागतो. यावेळी गर्भाचे डोके हे शरीराचा सर्वात मोठा भाग असतो. हृदय पूर्ण विकसित होते. 29 दात व हिरडयांचे काम सुरू होते. स्वरयंत्र आकाराला येते, पापण्या निर्माण होऊन मिटलेल्या अवस्थेत सातव्या महिन्या पर्यंत राहतात.

पहिल्या त्रैमासिकात खाण्याची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. पौष्टीक व सकस आहाराबरोबर डॉक्टरांनी दिलेल्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वेळच्याळेळी घेतल्या पाहिजे. तसेच हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये ह्यातूनही फॉलिक ऍसिड मिळते. फॉलिक ऍसिड अवयवांच्या प्रथम जडणघडणीत अत्यंत आवश्यक आहे.

 

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. यामध्ये प्रेग्नन्सी, डिलिव्हरी व बालसंगोपन याविषयी परिपूर्ण माहिती दिली आहे.

दुसरे सत्र Second Trimester – (4 ते 6 महिन्याचा काळ) :

चौथा महिना –
चौथ्या महिन्यामध्ये हार्मोन (संप्रेरके) निर्माण होऊ लागतात. चौथा महिना लागताच तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल. पहिल्या तीन महिन्यातली मळमळ, अन्नावरची वासना नसणे, थकवा सर्व हळूहळू कमी होऊन अधिक स्फूर्तीदायक वाटेल.
आता तुमच्या बाळाची शारीरिक रचना पूर्ण झाली असेल.
पाचवा महिना –
पाचव्या महिन्यामध्ये गर्भाची लांबी साधारण 25 सेंटीमीटर होते. ह्या महिन्यात गर्भाचे हात, पाय आणि बोटे विकसित होतात. इतर अवयवांबरोबरच भुवया व पापण्या येतील. तुमचे बाळ आता हालचाल करू लागेल. ह्या महिन्यात आपणास गर्भाची हलचाल जाणवायला लागेल.
पाचव्या महिन्यानंतर गर्भाशयाचा आकार वाढल्याने त्याचा दाब मूत्राशय (bladder) वर येतो व त्यामुळे सारखे लघवीला जावे लागते. तसेचं शरीरातल्या हार्मोन्सच्या बदलामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो त्यामुळे कधीकधी शौचास कठीण होऊ शकते.

सहावा महिना –
आता तुमच्या गर्भाशायाचा आकार वाढल्याने तुमचे पोट दिसू लागेल. तुमचा गर्भ सहा महिन्याचा असतांना जवळ जवळ 1 पौंडाचा असेल तसेच 10.5 इंच उंचीचा असेल. डोळ्यांची उघडझाप करू लागेल. ह्या महिन्यात तुमचे बाळ अधिक कार्यक्षम असेल. बाळाच्या संवेदना आता अधिक तीव्र झाल्या असतील. प्रखर प्रकाश, मोठा आवाज ह्यांना बाळ प्रतिसाद देतांना आईला जाणवेल.

ह्या दरम्यान स्त्रीरोग तज्ञ तुम्हाला सोनोग्राफी, रक्ततपासणी करायला सांगतील व टी.टी. चे इंजेक्शन देतील. तुमची कॅलशियम व लोहाची गरज वाढल्याने त्याच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देण्यात येईल.
सहाव्या महिन्यानंतर तुमचे दुसरे सत्र संपेल. पुढे येणारे तीसरे व अंतिम सत्र अधिक आनंददायी व स्पुर्तीदायक असेल. बाळाची आता तुम्ही आतुरतेने वाट पहायला लागाल.

 

तीसरे व अंतिम सत्र Third Trimester – (7 ते 9 महिन्याचा काळ) :

सातवा महीना –
बाळाची किक बसण्याची वेळ आत्ता आलेली आहे..! ह्या महिन्यात आपणास गर्भाची हलचाल स्पष्टपणे जाणवायला लागेल.
या महिन्यापासून बाळाची वाढ आता झपाटाने होते तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाच्या मेंदूची तसेच फुफ्फुसाची वाढ झपाटाने होते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास lanugo म्हणतात. तसेच बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव vernix संपूर्ण अंगभर पसरलेला असतो.

काही बालके ह्या महिन्यामध्येही जन्माला येऊ शकतात. गर्भावस्थेचा काळ पूर्ण होण्यापूर्वी काही दिवस आगोदर जन्म झाल्यास अकाली जन्म (Premature Birth) होतो. ही मुले अशक्त, कमी वजन असलेली व अपूरी वाढ झालेली देखील असू शकतात. मात्र त्यांच्यासाठी जन्मल्यानंतर विशेष देखभालीची गरज लागते.

आठवा महीना –
आपले बाळ, आत्ता
कोणत्याही वेळी ह्या नव्या जगामध्ये प्रवेश करू शकते. बाळाचा पूर्ण विकास ह्या महिन्यामध्ये झालेला असतो. बाळाची हालचाल आता तुम्हाला अधिक परिचयाची होते. प्रखर उजेडाला बाळाचे डोळे उघडझाप करू शकतात. आवाजाला प्रतिसाद देतात.

आपले डॉक्टर सोनोग्राफी करून बाळाची स्थिती, साधारण वजन, गर्भजलाचे प्रमाण व वारेची तपासणी हे बघितल्यावर प्रसूती केव्हा व कशी होईल याचा अंदाज बांधतात.
आता हा वाट बघण्याचा कालावधी संपत आलाय.. पुढे काय होणार? किती त्रास होणार? आॅपरेशन तर करावे लागणार नाही ना? मी बाळंतपणाच्या कळा सहन करू शकेन ना? अशा असंख्य प्रश्नांचे मोहोळ गर्भवतीच्या मनात उठत असते. विशेषत: पहिल्या प्रसूतीच्या वेळी ही हुरहूर, काळजी खूपच वाढते.
पण काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल. आपले कपडे, लागणाऱ्या वस्तू, औषधे, कागदपत्रे, बाळाचे कपडे इ. भरून बॅग तयार ठेवणे शेवटच्या 2-3 आठवड्यांत आवश्यक आहे.

नववा महीना (शेवटचा महिना) –
आपले बाळ कधीही ह्या नव्या दुनियेमध्ये प्रवेश करू शकते. ही वेळ आनंदाची तसेचं विशेष काळजीची ही आहे. जस-जशी प्रसूती जवळ येते तशी बाळाची हालचाल मंदावते. बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्याजोगी जागा नसते. पण हालचाल खूपच कमी झाल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा. बाळाचे वजन या महिन्यात साधारण 7 पाउंड पर्यंत असू शकते.
शक्य असल्यास घरातून सारखे बाहेर जाणे टाळा. तसेचं देखरेखीसाठी यावेळी आपल्या जवळ कोणीतरी सतत असणे गरजेचे आहे.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.