गर्भावस्था आणि लैंगिक संबंध – गर्भावस्थेत सेक्स करावा की नाही ते जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भावस्था आणि लैंगिक संबंध (सेक्स) :
स्त्री गर्भवती असताना तिच्या पोटात बाळ वाढत असते. या काळात गर्भवती आणि बाळाच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागत असते. अशावेळी गर्भावस्थेत सेक्ससंबंधित अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. गर्भावस्थेत सेक्स केल्याने बाळास धोका पोहचेल अशी भीतीही त्यांना वाटू शकते. यासाठी गर्भावस्थेत संबंध ठेवू शकतो की नाही किंवा गर्भावस्था असताना कोणत्या महिन्यात सेक्स बंद करावा, गर्भारपणात संभोग करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती येथे दिली आहे.

गर्भावस्थेमध्ये लैंगिक संबंध ठेवावा की नाही..?

जर स्त्रीची गर्भावस्था सामान्य असल्यास व स्त्रीचा सेक्ससाठी मूड असल्यास गर्भावस्थेमध्ये आपण सेक्स करू शकता.

गर्भावस्थेत किती महिन्यापर्यंत लैंगिक संबंध ठवू शकतो..?

स्त्रीची गर्भावस्था सामान्य असल्यास व स्त्रीस कोणत्याही विशेष आरोग्य समस्या नसल्यास साधारण आठव्या महिन्यापर्यंत लैंगिक संबंध ठवू शकता. नवव्या महिन्यात प्रसुतीची तारीख जवळ आल्यावर शेवटचे काही आठवडे लैंगिक संबंध ठेवणे ठाळावेत.

गर्भावस्थेत किती वेळा सेक्स करू शकतो..?

जर सामान्य गर्भावस्था असल्यास, कोणतीही विशेष आरोग्य समस्या नसल्यास आठवड्यातून दोनवेळा सेक्स करू शकता.

गर्भावस्थेत लैंगिक संबंध ठेवताना काय काळजी घ्यावी..?

गर्भावस्थेत सेक्स करताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक असते. पोटात गर्भाची वाढ होत असल्याने गर्भवती स्त्रीचे पोट वाढलेले असते अशावेळी योग्य स्त्रीच्या दृष्टीने आरामदायक सेक्स पोझिशन निवडणे गरजेचे असते. विशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या त्रैमासिकमध्ये सेक्सवेळी स्त्रीच्या पोटावर दबाव येणार नाही याची काळजी घ्यावी.

गर्भावस्थेत लैंगिक संबंध केंव्हा टाळावेत..?

गर्भावस्थेत स्त्रीला काही जटील आरोग्य समस्या असल्यास सेक्स करणे टाळणे आवश्यक असते. याशिवाय जर,
• गर्भावस्थेत जर स्त्रीच्या गर्भाशयाचे तोंड कमजोर असल्यामुळे त्याठिकाणी टाके घातलेले असल्यास,
• गर्भावस्थेत प्लेसेंटा प्रिवियाची स्थिती असल्यास,
• योनीतून रक्तस्राव येत असल्यास,
• पोटात अतिशय वेदना होत असल्यास,
• गर्भजलाची पिशवी फुटल्यास,
• गर्भवती स्त्रीची इच्छा नसल्यास,
• तसेच जर पतीला लैंगिक आजार जसे जेनिटल हर्पीस वगैरे असल्यास गर्भावस्थेत सेक्स करणे टाळले पाहिजे.

गर्भावस्थेत सेक्स केल्याने गर्भपात होतो का..?

गर्भावस्थेत गर्भ हा गर्भजलाच्या पिशवीमध्ये सुरक्षित राहत असतो. त्यामुळे गर्भावस्थेतही सेक्स केल्याने गर्भास विशेष असा धोका पोहचत नाही. मात्र जर आपल्या डॉक्टरांनी काही समस्या होणार असल्यास लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला दिल्यास सेक्स करणे टाळले पाहिजे.

हे सुद्धा वाचा..

गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.