Stomach ache Causes, Symptoms & Treatments in Marathi.
पोटात कळ मारून येणे –
पोटात कळ आल्यावर पोटात अतिशय वेदना होऊ लागतात. अनेक कारणांनी पोटात कळ येते. प्रामुख्याने अपचनामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पोटात बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन झाल्यानेसुध्दा पोटात कळ येते. पोटात कळ येणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
पोटात कळ मारणे याची कारणे –
पोटात कळ मारणे यासाठी अनेक करणे जबाबदार असू शकतात यामध्ये,
- घेतलेला आहार न पचल्याने अपचन होऊन पोटात कळ मारून येते.
- पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ भरपेट खाण्यामुळे अपचन झाल्याने,
- अन्नातून विषबाधा झाल्यानेही पोटात कळ मारून येते.
- दुधाचे पदार्थ पचत नसल्यास lactose intolerance मुळे,
- ग्लूटेन युक्त असणारे पचत नसल्यास त्यामुळेही पोटात कळ मारून येते.
- पचनसंस्थेत बॅक्टेरिया, कृमी किंवा व्हायरसचे इन्फेक्शन झाल्यामुळे पोटात कळ येते.
- जुलाब, अतिसार, गॅस्ट्रो, टायफॉईड, उलट्या, Irritable bowel syndrome, IBD ह्यासारख्या आजारांमुळे पोटात कळ येते.
- अपेंडीक्सला सूज आल्यामुळे पोटात कळ येऊ शकते.
- मानसिक तणाव किंवा भीतीमुळे,
- काही विशिष्ट औषधांच्या परिणामामुळे पोटात कळ मारून येऊ शकते.
- स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गरोदरपण यामुळे पोटात कळ मारून येते.
पोटात कळ येणे यामधील लक्षणे –
- पोटात अतिशय वेदना होतात हे यातील प्रमुख लक्षण असते. याशिवाय,
- पातळ शौचास होणे,
- मळमळ होणे,
- उलट्या होणे,
- ताप येणे यासारखी लक्षणे यामध्ये जाणवू शकतात.
कोणती लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे ..?
पोटात कळ येणे याबरोबरच जर खालील त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
- थांबून थांबून पोटात कळ येत असल्यास,
- पोटात अतिशय वेदना होत असल्यास,
- शौचातून रक्त येत असल्यास,
- भरपूर प्रमाणात उलट्या होत असल्यास,
- उलटीतून रक्त येत असल्यास,
- ताप आल्यास,
- तहान अधिक लागून डोळे, तोंड कोरडे पडत असल्यास,
- झटके येत असल्यास,
- पोटावर सूज आल्यासारखे वाटल्यास,
- श्वास घेताना त्रास होत असल्यास,
- डोळे, त्वचा पिवळसर रंगाची झाल्यास,
अशावेळी पोटात कळ मारून येणे या त्रासाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे तातडीने जाणे आवश्यक आहे.
पोटात कळ येणे याचे निदान कसे केले जाते ..?
रुग्णाची शारीरिक तपासणी, लक्षणे, आहार हिस्ट्री यांच्या आधारे डॉक्टर पोटात कळ येणे याचे निदान करू शकतात. तसेच अल्ट्रासाऊंड, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, एक्स-रे, MRI स्कॅन अशा तपासण्या कराव्या लागू शकतात. याशिवाय रक्त, लघवीची चाचणी सुद्धा करावी लागू शकते.
पोटात कळ येणे यावरील उपचार –
पोटात नेमकी कशामुळे कळ मारून येत आहे त्या कारणांनुसार यावरील उपचार ठरतात. जसे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने पोटात कळ येत असल्यास त्यावेळी डॉक्टर, antibiotics औषधे देतील. तसेच पोटातील कळ कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातील.
पोटात कळ येणे यावर घरगुती उपाय –
- पोटात कळ येत असल्यास अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे.
- गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे पोटात कळ येणे थांबते.
- पोटात कळ येत असल्यास गरम पाण्यात चिमुटभर हिंग व सैंधव मीठ घालून ते पाणी प्यावे.
- पोटात कळ येत असल्यास आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळावे. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे.
- पोटात कळ येत असल्यास पोटावर गरम शेक घ्यावा. हे घरगुती उपाय पोटात कळ मारणे यावर फायदेशीर ठरतात.
जर खानपानमुळे अपचन झाल्याने पोटात कळ येत असल्यास त्यावर वर दिलेले घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. मात्र जर इतर गंभीर कारणामुळे पोटात कळ येत असल्यास त्यावर घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
हे सुध्दा वाचा –
पोटात गॅस होणे याची कारणे व उपाय जाणून घ्या..
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about Stomach ache Causes, Symptoms, Treatment and Home solutions in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.