मुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)

Piles in Marathi information, Piles Causes, Symptoms, Types, Treatment in Marathi, Mulvyadh mahiti, Mulvyadh Upchar in Marathi.

मूळव्याध माहिती मराठीत :
मूळव्याध यालाच ‘पाईल्स’ किंवा ‘hemorrhoids’ असेही संबोधले जाते. आज बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसत आहे. प्रश्न आहे तो या आजारांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा आणि समाजात त्याबाबत जनजागृती करण्याचा.
मूळव्याध हा आजार बैठे काम करणा-या लोकांमध्ये विशेष करून आढळतो. मूळव्याध हा गुदद्वाराचा आजार आहे. सामान्यता गुदद्वाराच्या ठिकाणी कुठलंही लक्षण जाणवलं, की मला आता मुळव्याध झाली आहे, अशीचं प्रत्येक रुग्णाची भावना असते. मात्र गुदद्वाराजवळ अनेक आजार होतात. यामध्ये फिशर, भगंदर, मलावष्टंभ (Constipation) आणि मूळव्याध असे अनेक आजार गुदभागाजवळ आणि गुदभागामध्ये होत असतात.

मुळव्याध हा आजार दोन प्रकारांत मोडला जातो.
1) अंतर्गत मुळव्याध 2) बाह्य मुळव्याध

अंतर्गत मुळव्याध :
यालाच इन्टर्नल पाईल्स असे म्हणतात. आतील बाजूस झालेल्या मूळव्याधीमध्ये रक्तवाहिन्या प्रभावित होतात तसेच तेथील रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होतो.  गुदद्वाराच्या आतील बाजूस प्रभावित झालेल्या रक्तवाहिन्या फुगतात त्यामुळे सूज व वेदना रोग्याला जास्त जाणवते.  या आजारात प्राथमिक लक्षणं जास्त नसतात. शौचास साफ न होणं असं एक लक्षण असतं; परंतु वेदना, दाह कमी असतो. या व्याधीमध्ये शौचासोबत रस्त जाणं जास्त वेळा आढळतं.
यामध्ये मलत्याग करताना रोग्याला जास्त जोर द्यावा लागतो. त्या कारणास्तव रोग्याला खूप वेदना होतात. तसेच गुद्द्वाराला खाजणे, आग होणे, रक्तस्त्राव होणे या लक्षणांना सामोरे जावे लागते. आतील बाजूस मांसल गाठ तयार होऊन रोग्याला मलत्याग करण्यास कठीण जाते. काही गर्भवतींमध्ये डिलिव्हरीच्या वेळेस जास्त जोर द्यावा लागल्यास अशा स्त्रियांनाही मूळव्याध होण्याची संभावना असते. या प्रकारच्या मूळव्याधीमध्ये रोगी बध्दकोष्ठतेने त्रस्त असतो. तसेच अशा रुग्णांना खाली बसल्यानंतर त्रास होतो.

 बाह्य मुळव्याध :
गुदद्वाराच्या बाह्य भागामध्ये म्हणजे अगदीच गुदद्वाराजवळ होणारे मुळव्याध खरेतर आतील मुळव्याधीच्या नसा जास्त फुगून त्या गुदद्वाराच्या बाहेेर येऊ लावातात व त्यातच बाह्य मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारात वेदना व दाह अत्याधिक असतो. रुग्णाला बसण्यासही त्रास होतो.  या प्रकारच्या रोग्यांच्या गुद्द्वाराला मोठमोठ्या आकाराचे मांसल गुच्छ जाणवतात. या प्रकारात वेदना, आग, खाजणे, रक्तस्त्राव अशा प्रकारच्या लक्षणांना रोग्याला सामोरे जावे लागते.

मुळव्याधीच्या लक्षणानुसार मुख्य चार अवस्था करता येतील.
अवस्था 1 : वेदना कमी, क्वचित दाह, खाज होणे अशी लक्षणं या अवस्थेत असतात.

अवस्था 2 : शौचाच्या वेळी वेदना होणे, बद्धकोष्ठता, रक्तस्त्राव होणं, शौचास आग- खाज होणं, टोचल्यासारखे दुखणं अशी लक्षणं असतात. शौचाच्या वेळी गुदप्रदेशी मोड आल्याप्रमाणे जाणवते. ते बाहेर आलेले मोड शौचानंतर आपोआप जागेवर जातात.

अवस्था 3 : शौचाच्या वेळी भयंकर, बद्धकोष्ठता, रक्तस्त्राव, आग होणं, खाज येणं, टोचल्यासारखं दुखणं ही लक्षणं वाढतात. या अवस्थेतील रोग्याला शौचाच्या वेळी बाहेर येणारे मुळव्याधीचे मोड हातानं दररोज आत ढकलावे लागतात.

अवस्था 4 : या अवस्थेमध्ये वरील लक्षणं वाढतात आणि मुळव्याधीचा बाहेर येणारा भाग हातानं ढकलूनही आत जात नाही.

आयुर्वेदात मूळव्याधीचे दोन प्रकार वर्णिले आहेत. विना रक्तस्राव (मोडाची मूळव्याध-शुष्क अर्श) आणि रक्तस्रावासहित (रक्ती मूळव्याध-रक्तार्श).

मूळव्याधीची कारणे :
Piles causes in Marathi.
बध्दकोष्ठता (Constipation) – मूळव्याध होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बध्दकोष्ठता. पोट व्यवस्थीत साफ न होणे तसेचं मलाचा खडा धरणे म्हणजे बद्धकोष्ठता. म्हणूनच बध्दकोष्ठता असलेल्या रुग्णांनी वेळीच त्यावर उपचार घ्यावेत. बध्दकोष्ठतेमुळे गुद्धवाराच्या रक्तवाहिनीला अडथळा निर्माण होतो व तेथील रक्तवाहिन्या कमजोर होत जातात. त्या कारणानेच मूळव्याध ही व्याधी निर्माण होते.

बैठी जीवनशैली – बैठे काम करणा-या लोकांमध्ये, व्यायामाचा अभाव असणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. या लोकांमध्ये सुरुवातीला बध्दकोष्ठता होऊन त्याचे रुपांतर मूळव्याधीमध्ये होऊ लागते.

अयोग्य आहारामुळे – तिखट, खारट, मसालेदार पदार्थ, मांसाहार खाणे, चहा-कॉफी अतिप्रमाणात पिणे, अवेळी जेवण यामुळे पचनक्रियेत बिघाड होतो व मूळव्याधीस आमंत्रण मिळते.

मूळव्याध उपचार :
Piles Treatments in Marathi.
मूळव्याधवर आयुर्वेदात अनेक गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. मुळव्याधीच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार केले पाहिजेत. कारण हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. मूळव्याधीचा त्रास म्हणजे, धड सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही..! मात्र यावर आत्ता उपलब्ध आहे आमची मूळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका. अनेक रुग्ण हे मूळव्याधीचा त्रास असूनही संकोचपणामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेत नाहीत. अशाने आजार हा वाढतच जातो. यासाठी आम्ही हे उपयुक्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्यायोगे आपण मूळव्याधीवर औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत मूळव्याधीवरील औषधांची माहिती दिली आहे.
हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी कृपया आपण ह्या सुविधेचा लवकरात लवकर उपयोग करून घ्या.

मूळव्याधवरील औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘मूळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका’ आजचं डाउनलोड करा व मूळव्याधीच्या त्रासापासून सुटका मिळवा.

मूळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे –
• मूळव्याध सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎मूळव्याधवरील औषधे
• ‎मुळव्याध उपाय
• ‎मूळव्याध पथ्य-अपथ्य
• ‎मूळव्याध रुग्णाचा आहार कसा असावा, काय खावे, काय खाऊ नये
• ‎मूळव्याधीचा पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.


Paytm द्वारेही आपण पेमेंट करू शकता..
यासाठी आमच्या 8805442769 या नंबरवर 50 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 8805442769 या Whatsapp नंबरवर paytm पेमेंट जमा केल्याचे सांगा. उपचार पुस्तिका तात्काळ आपणास whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल.

Offline Payment Method :
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास काय करावे..?

आपण आमच्या बँक खात्यात पेमेंट जमा करूनही पुस्तक घेऊ शकाल. यासाठी खालील बँक खात्यात पुस्तकासाठीचे 50 रुपये जमा करा व आम्हाला Deposits Slip चा 8805442769 ह्या Whatsapp नंबरवर फोटो पाठवा. त्यानंतर आपणास तात्काळ पुस्तक पाठवून दिले जाईल.

BANK OF MAHARASHTRA, Ajara Dist- Kolhapur
Account holder name –
 Dr. Satish Upalkar
Account No. : 20140447629
IFSC Code : MAHB0000150

वाचकांची प्रतिक्रिया :
अल्पावधीतच हजारो लोकांनी पुस्तक डाउनलोड केले असून माहिती उपयुक्त ठरल्याबद्दल अनेकांनी इमेल पाठविले आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया –

सचिन, फलटण जि. सातारा
मला मूळव्याधीचा त्रास होत होता. अनेक उपचार करून पाहिले. तेवढ्यापुरते बरे वाटायचे आणि थोड्या दिवसात पुन्हा त्रास होऊ लागायचा. या पुस्तिकेतून मला पाळावयाचे पथ्ये यांची माहिती मिळाली. त्रास वाढवणारी कारणांची माहिती मिळाली. याशिवाय डॉक्टरांनी आयुर्वेदिक औषधे दिली आहेत. त्याचा खूप उपयोग होत आहे.

अशोक, घोरपडी जि. पुणे
डॉक्टरांनी पुस्तिकेत दिलेली औषधे घेत आहे. खूप चांगला फरक पडत आहे. मला मूळव्याधीतुन रक्त येत होते. सात दिवसातच रक्त पडण्याचा त्रास कमी झाला. मूळव्याधीत घ्यावयाचा आहाराची फायदेशीर माहिती मिळाली.

रेश्मा, आष्टी जि.बीड 

तीन वर्षापासून मला मूळव्याधीचा त्रास होत आहे. पोटही साफ होत नव्हते. शौचाच्या वेळी भयंकर वेदना होत होत्या. डॉक्टरांनी पुस्तिकेत दिलेली औषधे घेतल्यापासून पोट साफ होत आहे. मोडांना आलेली सुजही कमी झाली आहे. त्रास वाढू नये म्हणून घ्यावयाची काळजी यांची माहिती मिळाली.

रमेशराव, मुंबई
मी माझ्या त्रासावर होमिओपॅथी, आयुर्वेदिक अनेक घरगुती उपाय करून पाहिले. पण त्रास काही कमी होत नव्हता. या पुस्तिकेतून मला उपयुक्त माहिती मिळाली. सध्या सांगितलेली औषधे घेत आहे. योग्य पथ्य पाळत आहे. सूज व खाज कमी झाली आहे. मूळव्याधीचा त्रास कमी झाला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुळव्याधीच्या त्रासावर योग्य उपचार घेण्यासाठी खालील फॉर्ममध्ये आपली समस्या लिहा.

कधीपासून मूळव्याध त्रास होत आहे?

शौचावाटे रक्त पडते का?
होयनाही

दररोज पोट साफ होते का?
होयनाही

यापूर्वी कोणकोणते उपचार करून पाहिले?

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

मूळव्याध माहिती, मूळव्याध फोटो, मुळव्याध आयुर्वेदिक औषध, मूळव्याध व्यायाम, मुळव्याध आयुर्वेदिक औषध, पुण्यात मूळव्याध उपचार pune, maharashtra, मूळव्याध घरगुती उपाय मराठीत, मूळव्याध कोंब, मुळव्याध आहार, मुळव्याध म्हणजे काय, मुळव्याध आहार काय घ्यावा, मूळव्याध उपाय,मूळव्याधी (पाईल्स)वर सुटकारा मिळवण्यासाठी घरगुती उपाय. संडास करताना रक्त पडणे, मुळव्याध फिशर, भगंदर, mulvyadh upchar, piles treatment in marathi, piles tablet online, mulvyadh gharguti upchar, mulvyadh ayurvedic upchar pimpri-chinchwad, maharashtra, mulvyadh ayurvedic upchar in marathi, mulvyadh pathya in marathi, mulvyadh chi lakshane ani upay, mulvyadh ayurvedic upay, mulvyadh photo, mulvyadh home made upay in marathi, mulvyadh komb, mulvyadh kasa asto, mulvyadh symptoms, piles upchar in marathi.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.