मूळव्याध आजार : Piles causes, symptoms, types and treatments in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Piles information in Marathi :

पाईल्स आजाराची माहिती खाली दिली आहे.
आज अनेक लोकांना Piles किंवा Hemorrhoid चा त्रास आहे. यासाठी आपला चुकीचा आहार, लठ्ठपणा आणि बैठी जीवनशैली अशी प्रमुख कारणे जबाबदार आहेत. Piles ला मराठीमध्ये ‘मूळव्याध’ असे म्हणतात.

पाईल्समध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येत असते. तसेच शौचाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होत असतात. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तसुद्धा जात असते. यासाठी येथे piles ची कारणे, लक्षणे आणि उपचार याची माहिती दिली आहे.

Causes of Piles :

पाईल्सची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
पाईल्सचा त्रास होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. प्रामुख्याने चुकीचे खानपान, बद्धकोष्ठता, सततचे बैठे काम, कुटुंबात पाईल्सची अनुवंशिकता असणे, प्रेग्नन्सी आणि लठ्ठपणा असल्यास पाईल्सची समस्या होऊ शकते.

बद्धकोष्ठतेमुळे पाईल्सची समस्या होऊ शकते..
शौचाला नियमित साफ न होत असल्यास शौचाचा खडा धरत असल्यास त्यामुळे पाईल्स किंवा मुळव्याध होऊ शकतो. कारण शौचाचा खडा धरल्यामुळे मलप्रवृत्ती कठीण होते, जास्त जोर लावावा लागतो. परिणामी गुदाच्या ठिकाणी जास्त ताण येऊन पाईल्स किंवा मुळव्याध होऊ शकतो.

चुकीच्या आहारामुळे पाईल्सची समस्या होऊ शकते..
चुकीच्या खानपान यांमुळेही पाईल्सची समस्या होऊ शकते. विशेषतः वारंवार बेकरी प्रोडक्ट, जास्त तिखट व मसालेदार पदार्थ, मांसाहार, अंडी, चिकन व पचनास जड असणारे पदार्थ खाण्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, फळे यांचे प्रमाण कमी असल्यासही हा त्रास होऊ शकतो. कारण हिरव्या पालेभाज्या सारख्या आहारात पोट नियमित साफ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तंतुमय घटकांचे प्रमाण मुबलक असते. मात्र जर असा आहार न घेतल्यास तंतुमय पदार्थांची कमतरता होऊन बद्धकोष्ठता होत असते. परिणामी पाईल्सची समस्या होत असते.

Symptoms of Piles :

पाईल्सची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
• पाईल्समध्ये गुदाच्या शिरांना सूज येते, त्याठिकाणी कोंब किंवा मोड येतात.
• गुदाच्या ठिकाणी भयंकर वेदना होणे, खाज येणे, जळजळ व आग होणे अशी लक्षणे असतात.
• शौचाच्या वेळी त्रास अधिक वाढतो.
• काहीवेळा शौचातुन रक्तही जात असते. अधिक प्रमाणात रक्त जाण्यामुळे ऍनिमिया होऊ शकतो. ही लक्षणे पाईल्समध्ये असतात.

Types of Hemorrhoid :

पाईल्सचे internal आणि external असे दोन मुख्य प्रकार होतात.

1) Internal Hemorrhoid –
इंटर्नल पाईल्स हे गुदाच्या आत होतात. शौचाच्यावेळी इंटर्नल पाईल्सचे कोंब बाहेर येतात आणि नंतर पुन्हा आत आपल्या जागेवर जातात. इंटर्नल पाईल्सचे चार ग्रेड मध्ये वर्गीकरण केले जाते.

पहिली ग्रेड (First degree piles) – यातून रक्त येऊ शकते मात्र यातील कोंब गुदाच्या ठिकाणी हे बाहेर येत नाहीत.

दुसरी ग्रेड (Second degree piles) – शौचाच्यावेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात आणि पुन्हा आत आपल्या जागी जातात.

तिसरी ग्रेड (Third degree piles) – शौचाच्यावेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात मात्र ते आपोआप पुन्हा आत जात नाही. ते आत जाण्यासाठी हाताने ढकलावे लागतात.

चौथी ग्रेड (Fourth degree piles) – या प्रकारचे कोंब हे सतत बाहेर आलेले असतात. ते ढकलूनही आत जात नाहीत. त्या कोंब जास्त सुजलेले आणि वेदनादायक असतात.

2) External Hemorrhoid –
गुदाच्या बाहेरच्या बाजूस ह्या प्रकारचे कोंब असतात. याचे कोंब हे सुजलेले असतात. त्यामुळे अतिशय वेदनाही होत असते.

आयुर्वेदातही पाईल्सचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. ज्या पाईल्समध्ये कोंब येणे, खाज, वेदना व आग होणे अशी लक्षणे असतात मात्र रक्त पडत नाही त्या प्रकाराला ‘शुष्क अर्श’ असे म्हणतात. तर पाईल्सच्या त्रासात रक्त जात असल्यास त्या प्रकाराला ‘रक्तार्श’ असे म्हणतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

Piles & Treatment :

पाईल्सवर हे आहेत उपचार..
पाईल्सचा त्रास अत्यंत त्रासदायक असा असतो. पाईल्सवर आयुर्वेदिक अनेक औषधे उपयुक्त ठरतात. आमच्या तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी ‘मुळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका’ यामध्ये पाईल्सवरील आयुर्वेदिक औषध उपचार यांची माहिती दिली आहे. ही उपयुक्त पुस्तिका pdf file डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Treatment of piles in Marathi

In this article contains information about Piles symptoms, causes, types and treatments in Marathi.