फयटोस्टेरोल्स – आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त पोषकतत्व (Phytosterol in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Phytosterol and health in Marathi

फयटोस्टेरोल्स म्हणजे काय..?

केवळ वनस्पतींमध्ये आढळणारा हा स्टेरॉलचा प्रकार आहे. विविध धान्ये, कडधान्ये, फळे, भाजीपाला ह्यामध्ये आढळणारे फयटोस्टेरोल्स हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पोषकतत्व आहे. फयटोस्टेरोल्समुळे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी होण्यास मदत होते. त्यामुळे धमनीकाठिन्यता, विविध हृद्रोग, कँसर होण्यापासून रक्षण होते.

बॅड कोलेस्टेरॉल आणि फयटोस्टेरोल्स –
बॅड कोलेस्टेरॉल हे आरोग्यासाठी अत्यंत घातक असते तर फयटोस्टेरोल्स आरोग्यासाठी चांगले असते. कोलेस्टेरॉल आणि Phytosterol ची रचना एक सारखी असली तरीही दोघांचे कार्य मात्र परस्पर भिन्न असे आहे.

कोलेस्टेरॉल आपल्या शरीरातील यकृतात निर्माण होत असते शिवाय बाहेरुन घेतलेल्या आहारामुळेही जसे. तुप, लोणी, मांसाहार, अंडी, सॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थांमुळे बाहेरुनही आहाराद्वारे कोलेस्टेरॉल शरीरात जात असते. अशा ह्या कोलेस्टेरॉलचे रक्तामध्ये सहजासहजी अवशोषण होत असते. पर्यायाने रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. त्यामुळे धमनीकाठीन्यता, हृद्रोग, उच्चरक्तदाब यासारखे गंभीर विकार उत्पन्न होतात. तर फयटोस्टेरोल्स हे शरीरामध्ये तयार होत नाही केवळ वनस्पतींमध्येच आढळते म्हणून त्यास वनस्पतीज स्टेरॉल असेही म्हणतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

फयटोस्टेरोल्सचे फायदे –
संशोधनातून सिद्ध झाले आहे की दररोज 2 ग्रॅम पेक्षा अधिक फयटोस्टेरोल्स घेतल्यास सुमारे 10 टक्के इतके वाईट कोलेस्टेरॉल LDL कमी होण्यास मदत होते.
तर चांगल्या कोलेस्टेरॉल HDL वर फयटोस्टेरोल्समुळे कोणताही परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाले आहे.
धमनीकाठीन्यता, हृद्रोग, उच्चरक्तदाब, कैन्सर यासारखे गंभीर विकार होण्याचा धोका फयटोस्टेरोल्समुळे कमी होतो

विविध वनस्पतीज तेलातील फयटोस्टेरोल्सचे प्रमाण –

तिळतेल (100 gm) 865 mg
करडई तेल (100 gm) 444 mg
भुईमुग तेल (100 gm) 207 mg
ऑलिव ऑयल (100 gm) 176 mg
नारळतेल (100 gm) 86.0 mg

वाईट कोलेस्टेरॉलमुळे होणाऱ्या खालील आजारांचीही माहिती वाचा..
हार्ट अटॅक मराठीत माहिती
मधुमेह – डायबेटीस विकार
हाय ब्लडप्रेशरचा त्रास
लठ्ठपणा – वजन अधिक असण्याची समस्या
पक्षाघात – लकवा