मासिक पाळीच्या तक्रारी

6122
views

Periods problems in marathi, home remedies for menstruation problems in Marathi, menstruation problems in Marathi.

मासिक पाळीच्या तीन प्रमुख तक्रारी असतात.
(1) पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जाणे.
(2) पाळीच्या वेळी पोटात दुखणे
(3) पाळी न येणे किंवा पाळी बंद होणे

मासिक पाळीच्या तक्रारी :
(1) पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जाणे –

अनेक स्त्रियांना पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जाणं हा त्रास होत असतो. अशा पाळीबरोबर पोटदुखी, अशक्तपणा ही लक्षणेही असू शकते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे तसेच
गर्भाशय, बीजांडकोष किंवा गर्भनलिका यांना सूज आल्यामुळेही पाळीच्या वेळी अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. अशावेळी विश्रांतीची गरज असते तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. पाळीमध्ये अतिरक्तस्राव झाल्याने ऍनिमिया सारखे विकार होऊ शकतात.

(2) पाळीच्या वेळी पोटात दुखणे –
अनेकजणींना पाळी येण्याआधी, पाळी चालू असताना किंवा पाळीनंतर पोटात दुखू लागते. काही मुलीना पाळी सुरु होण्याअगोदर दोन तीन दिवस पोट दुखीचा त्रास होतो व पाळी सुरु झाली की त्रास थांबतो. बऱ्याचवेळा हा त्रास तात्पुरता असतो व थोड्याफार उपचाराने थांबू शकतो. अनेक महिलांना पाळीच्या दिवसांमध्ये ओटीपोटात दुखण्याचा त्रास होतो. पाळीच्या दिवसांमध्ये गर्भाशय आकुंचन पावत असतं. त्यामुळे ओटीपोटात दुखण्याचा प्रकार घडतो. हा आजारही नव्हे तसेच यासाठी औषधाची गरज नसते. अशावेळी विश्रांती घेणं तसेच गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेणं असे सोपे, घरगुती उपाय करावेत.
जास्त प्रमाणातील पोटदुखी बरोबर, चक्कर येते किंवा उलटीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे जास्त त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे आवश्यक असते.

(3) पाळी न येणे किंवा पाळी बंद होणे –
वयाच्या 17 ते 18व्या वर्षांपर्यंत पाळी सुरू न झाल्यास त्यास Primary amenorrhoea असे म्हणतात. अशावेळी ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करून घेणे आवश्यक असते.
आणि जर पूर्वी पाळी सुरू होऊन पुन्हा पाळी येणेच बंद झाले असेल तर त्यास सेकंडरी अमेनोरिया असे म्हणतात. 5 ते 6 महिन्यापर्यंत पाळी न आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञकडून तपासणी करून घ्यावी. जर पाळी बंद होण्याबरोबरचं व्यंधत्व समस्या असल्यास ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करून घेणे आवश्यक असते.
अनेक स्त्रियांना पाळीच्या वेळी अंगावरून कमी जातं किंवा पाळी उशिरा येते, अनियमित पाळी येते अशावेळी जर त्यांचा आहार सुधारल्यास व रक्तवर्धक औषधे दिल्यास ही तक्रार नाहीशी होते.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.