पांढऱ्या झालेल्या केसांवर हे करा घरगुती उपाय..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

पांढऱ्या केसांवर कोणते उपाय करावेत..?

आज अगदी कमी वयामध्येही पांढऱ्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या केसांची योग्य काळजी घेणे अशक्य झाले आहे. तसेच अनुवंशिकता, चुकीचे खाणेपिणे, कामाचा ताण आणि प्रदुषण अशा विविध कारणांनी पांढऱ्या केसांची समस्या वाढली आहे. यासाठी येथे पांढऱ्या झालेल्या केसांवर काही उपयुक्त उपाय यांची माहिती खाली दिली आहे.

पांढऱ्या केसांवर हे करा घरगुती उपाय..

आवळा –
आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस पिळून पेस्ट करून ती केसांवर लावावी. याशिवाय आवळा असलेल्या तेलाने केसांना दररोज रात्री मालिश करावी.

कोरफड –
कोरफडीचा गर काढून त्यामध्ये लिंबू पिळून ते मिश्रण पांढऱ्या केसांवर लावावे. काही वेळानंतर केस धुवून टाकावेत. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.

कडीपत्ता –
खोबरेल तेलात कडीपत्ताची पाने टाकून तेल उकळून घ्यावे. तयार केलेले तेल रोज काही दिवस आपल्या केसांना लावून मसाज करावा.

भृंगराज –
भृंगराजपासून बनवलेले तेल आपण दररोज केसांवर लावल्यास पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

आंब्याची पाने –
आंब्याची पाने बारीक करून त्यांची पेस्ट बनवा आणि ती पेस्ट केसांना 15 मिनिटे लावावी. त्यानंतर केस धुवावेत यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

कांदा –
कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यात लिंबू रस घालावा. ही पेस्ट केसांना लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवावेत. पांढऱ्या केसांवर हा उपयाही खूप उपयुक्त असतो.

Health tips for White hair in Marathi.