स्वादुपिंडशोथ निदान व उपचार

1240
views

स्वादुपिंडशोथ निदान :
रुग्ण इतिहास, व्यक्त लक्षणे, शारीरीक तपासणी यांद्वारे स्वादुपिंडशोथाचे निदान होण्यास मदत होते. याशिवाय खालिल वैद्यकिय चाचण्यांचा निदानासाठी करणे गरजेचे असते.
◦ एक्स रे परिक्षण
◦ अल्ट्रासाउंड परिक्षण
◦ CT scan ह्या परिक्षणांमुळे स्वादुपिंडामधील अवरोधाचे कारण कळण्यास मदत होते. जसे स्वादुपिंडामध्ये खडे असणे आणि त्यामुळे अवरोध होणे.

अन्य तपासण्या
◦ रक्त परिक्षण – रक्तातील पांढऱया पेशींची संख्या तपासली जाते.
◦ मुत्र परिक्षण – मुत्रातील शर्करेचे प्रमाण तपासले जाते.

दिर्घकालीन दुष्परिणाम –
स्वादुपिंडशोथाची अवस्था अधिक काळापर्यंत राहिल्यास शरीरावर खालील परिणाम होतात.
◦ मधुमेह होणे – इन्सुलिन स्त्रावास अवरोध झाल्याने.
◦ शारीरीक दुर्बलता,
◦ वजन कमी होणे – पचनक्रियेमध्ये विकृती निर्माण झाल्याने.
◦ स्वादुपिंड निकामी होणे यासारखे गंभीर परिणाम उत्पन्न होतात. यासाठी स्वादुपिंडशोथावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते.
प्रतिबंधात्मक उपाय –
◦ आहारातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण मर्यादितच ठेवावे.
◦ मद्यपान करु नये,
◦ भोजनात कर्बोदके, कैल्शियमचे प्रमाण अधिक असावे.

उपचार मार्गदर्शन –
वेदना थांबवण्यासाठी वेदना नाशक औषधांचा वापर केला जातो. शारीरीक दुर्बलता नष्ट करण्यासाठी औषधांची योजना केली जाते.
शस्त्रक्रिया – स्वादुपिंडामध्ये खडे असल्यास शस्त्रक्रियेद्वारे खडे काढले जातात.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.