स्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)

पचनक्रियेमध्ये स्वादुपिंड महत्वाची भुमिका निभावतो. हा अवयव पोटाजवळ असून त्यामधून महत्वाचे स्त्राव निघत असतात. या स्रावांमध्ये पाचकस्राव (Digestive enzymes), इन्सुलिन स्त्राव आणि Glucagons या महत्वच्या स्त्रावांचे स्त्रवण स्वादुपिंडातून होत असते. हे स्राव स्वादुपिंड नलिकेतून ग्रहणीमध्ये येऊन आहाररसामध्ये मिसळून पचनक्रियेमध्ये भाग घेतात.