सेंद्रिय गुळ – Organic Jaggery

सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत. सेंद्रिय गूळ दिसायला तांबूस काळसर रंगाचा (red-dark brown color) आणि मऊ असतो. आरोग्यासाठी अशा रसायनविरहित सेंद्रिय गुळाचे फायदे अनेक असतात.

केमिकल्स असणारा गुळ आरोग्यासाठी अपायकारक असतो. केमिकल्सयुक्त गुळ तयार करताना विविध रसायने वापरली जातात. यामध्ये गंधक (सल्फर), सोडीयम हायड्रोफॉस्फेट, कॅल्शियम ऑक्साईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट यांचा वापर केला जातो.

केमिकल्सचा वापर प्रामुख्याने गुळाची चव, रंग आणि गुळ अधिक काळ टिकण्यासाठी केला जातो. गुळाला अधिक पिवळा रंग येण्यासाठी गंधक पावडर (सल्फरची पावडर) मिसळली जाते. यामुळे गुळाच्या पिवळ्या रंगावर न भाळता काळसर तांबूस असलेला सेंद्रिय गूळच खाण्यासाठी वापरला पाहिजे.

सेंद्रिय गुळ खाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास वाढण्यास मदत होते. यात पोटॅशिअम मुबलक असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. यात मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने आपले स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते.सेंद्रिय गुळ खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते. नियमित पोट साफ होण्यास मदत होते. यामुळे आपल्या यकृतातील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते.

सेंद्रिय गुळाचे फायदे –

सेंद्रिय गुळात अनेक पोषकतत्वे असतात..
सेंद्रिय गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषकघटक असतात. सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी अनेक महत्वाची पोषकतत्वे असतात.

हिमोग्लोबिन वाढवते..
सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी ऍनिमिया दूर करण्यासाठी सेंद्रिय गुळ खाणे फायदेशीर असते.

रक्तदाब नियंत्रित ठेवतो..
सेंद्रिय गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

मांसपेशी बळकट बनवतो..
सेंद्रिय गुळामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियमचे प्रमाण असते. यामुळे मांसपेशी बळकट होण्यासाठी मदत होते.

पचनशक्ती सुधारते..
सेंद्रिय गुळ खाण्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करते..
सेंद्रिय गूळ खाण्यामुळे आपल्या यकृतातील अपायकारक विषारी घटक दूर होण्यास (लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होण्यास) मदत होते.

डायबेटीसचे पेशंट सेंद्रिय गूळ खाऊ शकतात का..?

सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे अनेक असले तरीही डायबेटीस रुग्णांनी कोणत्याही प्रकारचा गूळ खाणे शक्यतो टाळावे. कारण गुळ खाण्यामुळे रक्तातील साखर (ब्लड शुगर) वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यानी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गुळ खाऊ नये. डायबेटीसविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

गरोदरपणात सेंद्रिय गुळ खाऊ शकतो का..?

गरोदरपणात लोहाचे खूप महत्त्व असते. तसेच सेंद्रिय गुळात अनेक पोषकघटक असतात. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी आणि डिलिव्हरीनंतरही सेंद्रिय गूळ खाणे उपयोगी असते.

हे सुध्दा वाचा – मध खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या..

Read Marathi language article about Organic jaggery health benefits. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *