तोंडाचा कर्करोग – Oral cancer :

आपण अनेक प्रकारच्या कर्करोगाबद्दल ऐकले असेल, त्यापैकी एक आहे तोंडाचा कर्करोग. याला ओरल कॅन्सर ह्या नावानेही ओळखले जाते. तोंडाचा कर्करोग (Mouth Cancer) हा तोंडातील ओठ, हिरड्या, जीभ, घसा, टाळू अशा तोंडाच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. तंबाखू, सुपारी खाण्याच्या सवयीमुळे भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळतात. तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.

तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे (Mouth cancer symptoms) :

तोंडाच्या कर्करोगाची सुरवात हळूहळू होत असते. तंबाखूचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींच्या तोंडामध्ये सुरवातीला पांढरट चट्टे (ल्यूकोप्लाकिया) किंवा लाल चट्टे (एरिथ्रोप्लाकिया) दिसू लागतात. असे चट्टे दिसल्यानंतरही त्या व्यक्तीने तंबाखूचे व्यसन सुरुचं ठेवल्यास त्या चट्ट्यामध्ये गाठ, व्रण निर्माण होऊन तोंडाचा कर्करोग होतो. कॅन्सरच्या ऍडव्हान्स्ड स्टेजमध्ये खालील लक्षणे दिसून येतात.

  • तोंडात जखमा व सूज येऊन वेदना होऊ लागतात.
  • ‎तोंडातून रक्तस्राव होणे.
  • ‎तोंड उघडण्यास त्रास होऊ लागतो.
  • ‎बोलताना किंवा अन्न गिळताना, अन्न चावण्यास त्रास होऊ लागतो.
  • ‎अशक्तपणा, वजन कमी होते.

तोंडाच्या कॅन्सरची कारणे (Mouth cancer causes) :

  • वयाच्या 40शी नंतर तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.
  • ‎तंबाखू, गुटका, पानमसाला, सुपारी, सिगारेट, बिडी, चिलीम, हुक्का, मद्यपान यांचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
  • ‎तोंडाचा कर्करोग जर कुटुंबातील आजोबा, वडील, आई, भाऊ, बहीण यांना झालेला असल्यास अनुवंशिकतेमुळेही तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

तोंडाच्या कर्करोगावरील उपचार (Oral cancer treatments) :

तोंडाच्या कर्करोगाचा उपचार हा कोणत्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे यावर अवलंबून असतो. गाठेचे स्वरूप, कॅन्सर किती पसरलेला आहे याप्रमाणे उपचार पद्धती ठरते. सर्जरी आणि केमोथेरेपीद्वारे ह्या कर्करोगावर उपचार केला जातो. तोंडाच्या कर्करोगाचे निदान अगदी सुरुवातीला झाल्यास त्यावर शस्त्रक्रिया करून कर्करोगाचे बाधित भाग काढून टाकल्यास कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.

हा कॅन्सर हळूहळू वाढत असल्याने आणि सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने अनेकदा तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण हे ऍडव्हान्स्ड स्टेजमध्ये कॅन्सर गेल्यावर उपचारासाठी येत असतात. मग अशावेळी उपचाराचा फारसा उपयोग होत नाही.

तोंडाचा कर्करोग होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी :

  • तंबाखू, गुटका, पानमसाला, सुपारी, सिगारेट, बिडी, चिलीम, हुक्का, मद्यपान यांचे सेवन करने टाळा.
  • ‎याआधी जर यांचे व्यसन केलेले असल्यास वर्षातून किमान एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
  • ‎याशिवाय महिन्यातून एकदातरी स्वतःच्या स्वतः तोंडाची तपासणी करावी. तोंडामध्ये चट्टे, व्रण, गाठ आहे का ते पाहावे. तसे काही आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे.
  • ‎संतुलित आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, फळे आहारात समाविष्ट करावीत.
  • ‎तोंडाची स्वच्छता ठेवावी.

खालील कॅन्सरचीही माहिती जाणून घ्या..

Read Marathi language article about Oral cancer causes, symptoms, stages, treatment option and prevention tips. Last Medically Reviewed on February 20, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.