ओकारी येणे :
ओकारी येत असल्यास उलटी झाल्यासारखे वाटत असते. ओकारीमुळे काहीही खाण्याची इच्छा होत नाही. तसेच त्यामुळे मळमळ व अस्वस्थता वाटू लागते. पचनक्रियेसंबंधित हा त्रास असून प्रामुख्याने पित्त वाढणे, डोकेदुखी, अर्धशिशी, गर्भावस्था, प्रवास यामुळे ओकारी येऊ शकते.
ओकारी येत असल्यास हे करा घरगुती उपाय :
आले –
आल्याचा तुकडा सैंधव मीठ लावून खाल्यास ओकारी येणे थांबते. आले थोड्या पाण्यात घालून उकळून घ्यावे आणि त्या पाण्यात मध घालून पिण्यामुळेही ओकारी कमी होण्यासाठी मदत होते.
लिंबू रस –
लिंबूरसाच्या वासाने ओकारी कमी होते. ओकारी जाणवत असल्यास लिंबू रसात मध घालून मिश्रण तयार करावे व त्याचे चाटण करावे.
जिरे –
ओकारी येत असल्यास थोडे जिरे चावून खावेत. ओकारी थांबण्यास मदत होते.
बडीशेप –
ओकारीवर थोडी बडीशेप चावून खावी. बडीशेपमध्ये अनेक बायोऍक्टिव्ह घटक असतात त्यामुळे ओकारी कमी होते.
हे सुद्धा वाचा..
उलटी होत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.