लठ्ठपणा कोणकोणत्या कारणांमुळे होतो

1043
views

Obesity causes information in marathi, weight loss tips in marathi weight management in marathi excercise and diet plan for weight loss in in marathi.

बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहाराच्या अतिरेकामुळे आज सर्वच वयाच्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणाची समस्या भेडसावत आहे. शरीरातील चरबीची जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. स्थूलता किंवा ओबेसिटी ही अशी समस्या आहे की, ज्यामुळे पुढे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात. हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, स्पॉन्डीलायटीस, स्त्रियांमधील पीसीओडी समस्या यासारख्या आजारांमध्ये महत्वाचे कारण म्हणजे गरजेपेक्षा वजन अधिक असणे हे ठरत आहे.

शरीरात मांस (स्नायू), हाडे आणि चरबी यांमुळे वजन वाढते. यापैकी स्नायू व हाडांमध्ये भर पडल्याने वजन वाढणे हे चांगले असते तर चरबी जमा झाल्याने वजनात पडलेली भर ही धोक्याची सूचना असते.

लठ्ठपणा आणि बीएमआय :

लठ्ठपणाचे प्रमाण BMI (Body Mass Index) द्वारे मोजले जाते. बीएमआय नुसार उंची आणि वजनाचे प्रमाण तपासले जाते. 18 वर्षांवरील व्यक्तींच्या वजन आणि उंचीच्या प्रमाणातून बीएमआय काढले जाते. यामधून उंचीच्या तुलनेत शरीराचे अपेक्षित वजन कमी किंवा जास्त आहे का? हे ओळखता येऊ शकते. बॉडी मास इंडेक्स जर 30 पेक्षा जास्त असेल तर ते स्थूलतेच्या आजाराचं लक्षण समजलं जाते.

बीएमआय आणि वजन स्थिती :
• BMI 18.5 पेक्षा कमी असल्यास अंडरवेट म्हणजे नॉर्मलपेक्षा कमी वजन असते.
• ‎BMI 18.5 ते 25 पर्यंत असल्यास त्याला नॉर्मल वजन मानले जाते.
• जेंव्हा BMI हा 25.0 ते 29.9 पर्यंत असतो तेंव्हा त्याला नॉर्मलपेक्षा वजन जास्त आहे असे मानले जाते.
• ‎30.0 ते 39.9 पर्यंत BMI असल्यास त्याला लठ्ठपणा असे मानले जाते.
• ‎तर 40 पेक्षा अधिक BMI दर्शवत असल्यास त्याला अतिलठ्ठपणा असे मानले जाते.

बीएमआयची अचूकचा किती..?
बीएमआय हा 100% अचूक असेलच असे नाही कारण बीएमआय काढताना केवळ उंची आणि वजनाचा विचार केला जातो. मात्र यामध्ये बॉडी फ़ॅट किंवा मसल्सचा विचार केला जात नाही. शरीरात मसल्स (स्नायू), हाडे आणि बॉडी फ़ॅट (चरबी) यांमुळे वजन वाढते. उदाहरणार्थ खेळाडूंमध्ये मसल्स आणि हाडांचे वजन हे जास्त असते तर बॉडी फ़ॅटचे प्रमाण कमी असते. असे असूनही त्यांचा जेंव्हा BMI काढला जातो तेंव्हा तो ओव्हरवेट येत असतो..! तेंव्हा बीएमआय हा 100% अचूक असेलच असे नाही. लठ्ठपणाची साधी सोपी व्याख्या म्हणजे शरीरात बॉडी फ़ॅट किंवा चरबीचे प्रमाण जास्त असणे ही आहे.

पोटाचा घेर आणि लठ्ठपणा :
पोटाजवळील चरबी जास्त प्रमाणात वाढल्यास हृद्यविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात, टाईप 2 मधुमेह हे विकार होण्याचा धोका अधिक वाढतो. यासाठी पुरुषांचा पोटाचा घेर हा 90 सेमी पेक्षा जास्त असू नये तर स्त्रियांचा पोटाचा घेर हा 80 सेमी पेक्षा जास्त असू नये.

लठ्ठपणाची कारणे :
शरीरात स्थुलता निर्माण होण्यास, वजन वाढण्यास अनेक घटक कारणीभूत असतात.
• गरजेपेक्षा जास्त आहार घेण्याची सवय, सतत काहीतरी खात राहण्याची सवयीमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
• ‎जास्त कॅलरी असणारे पदार्थ, साखरेचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, चॉकलेट्स, तळलेले पदार्थ, हवाबंद पदार्थांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
• ‎दिवसा झोपणे, शारीरीक श्रमाचा अभाव, बैठी आरामदायी जीवनशैली यांमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
• ‎व्यायाम न करणे यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. व्यायामाच्या अभावाने आहारातून घेतलेल्या कॅलरीज वापरल्या जात नाहीत त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज चरबीच्या रुपात वाढू लागतात.
• ‎वजन वाढीस अनुवंशिकता हा घटक कारणीभूत ठरू शकतो. आई-वडील जाड असल्यास अनुवंशिकतेमुळे मुलांमध्येसुद्धा लठ्ठपणा आढळतो.
• ‎शरीरामधील चयापचय संबंधी विकृतीमुळे किंवा हायपो-थायरॉइडिझम सारख्या आजारामुळेही वजन वाढू शकते.

लठ्ठपणाची लक्षणे :
• पोट, नितंब, स्तन, मांड्या या ठिकाणी चरबी वाढणे.
• ‎पोटाचा घेर अधिक असणे.
• ‎बीएमआय 40 पेक्षा जास्त असणे.
• ‎थोडे काम केले असता थखवा जाणवणे.
• ‎श्‍वास घ्यायला त्रास होणे.
• ‎अनुत्साह, आळस येणे, झोप, सुस्ति अधिक येणे.
• ‎स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित न येणे यासारखी लक्षणे स्थुलतेमध्ये सामान्यतः असतात.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

लठ्ठपणामुळे होणारे दुष्परिणाम :
चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या चरबीमुळे पुढे अनेक गंभीर आजार निर्माण होतात. यामध्ये,
• हार्ट अटॅक, विविध हृद्यविकार होतात.
• ‎उच्च रक्तदाब,
• ‎धमनीकाठिन्यता,
• ‎पक्षाघात किंवा अर्धांगवायु (Stroke),
• ‎टाइप-2 मधुमेह,
• ‎अनेक प्रकारचे कॅन्सरला स्थुलता हे कारण ठरते,
• ‎पित्ताशयाचे विकार, पित्ताशयात खडे होणे,
• ‎संधिवात, गुडघेदुखी, पाठदुखी,
• ‎स्त्रियांमधील मासिक पाळीसंबंधी समस्या, अनियमित पाळी, वंध्यत्व, पीसीओडी समस्या होणे ह्यासारखे विकार लठ्ठपणामुळे होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी वजन आटोक्यात ठेवणे गरजेचे असते.

जास्त धोका कोणाला..?
• वयाच्या चाळिशीनंतर लठ्ठपणा असणे धोकादायक असते.
• ‎लठ्ठ व्यक्तींना सिगारेटचे व्यसन असणे धोकादायक असते.
• ‎लठ्ठ व्यक्तीच्या अनुवंशिकतेमध्ये हृद्यविकार असणे धोकादायक असते,
• ‎लठ्ठ व्यक्तिस हृद्यरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, धमनीकाठिन्यता असणे धोकादायक असते.
• ‎लठ्ठ व्यक्तींमध्ये LDL कोलेस्टेरॉलचे (बॅड कोलेस्टेरॉल) प्रमाण अधिक असणे धोकादायक असते.
• ‎हार्ट अटॅक आलेला असल्यास किंवा बायपास झालेली असल्यास लठ्ठपणा असणे धोकादायक असते.

लठ्ठपणा उपचार :
वजन कमी करण्यासाठीच्या उपाययोजना –
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि दृढ इच्छाशक्ती याद्वारे वजन आटोक्यात आणणे शक्य आहे. येथे क्लिक करा व वजन कमी करण्यासाठीच्या स्मार्ट टिप्स जाणून घ्या.

व्यायाम नियोजन –
वजन कमी करण्यासाठी, चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर मार्ग म्हणजे व्यायाम. व्यायामामुळे शरीर निरोगी आणि बांधेसूद बनते. व्यायामामुळे स्नायूंची (मसल्सची) शक्ती, लवचिकता वाढते. मसल्स मजबूत बनतात. शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते, शरीराच्या चयापचयाच्या गतीमध्ये सुधारणा होते. हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. पर्यायाने स्टॅमिना वाढतो. रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते. कोलेस्टेरॉल नियंत्रित होते. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या सर्व विकारांपासून दूर राहण्यास व्यायामामुळे मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास, आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा. 
नियमित व्यायाम, योगासने करावित, जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा. 
व्यायाम सुरु करताना सुरवातीस कमी प्रमाणात करुन दररोज थोडा-थोडा व्यायाम वाढवत जावे. एकाच दिवशी जास्त प्रमाणात व्यायाम करु नये. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा.

अर्धा तासाचा व्यायाम आणि बर्न होणारी कॅलरी :
• अर्धा तास चालणे – 200 कॅलरी
• ‎अर्धा तास सायकलिंग – 330 कॅलरी
• ‎एरोबिक व्यायाम – 260 कॅलरी
• ‎मैदानी खेळ – 250 कॅलरी
• ‎पोहण्याचा व्यायाम – 280 कॅलरी

साधारण 3500 कॅलरीज म्हणजे एक पाऊंड. एका आठवड्यात एक पाऊंड वजन कमी करायचं असेल तर दिवसाला 500 कॅलरीज कमी होतील इतका व्यायाम करणे गरजेचे असेल.
वजन कमी करण्यासाठी दररोज 45 मिनिटे चालण्याचा व्यायाम किंवा एरोबिक व्यायाम,करावा तसेच 20 मिनिटे सायकलिंगचा व्यायाम करावा.

वजन कमी करायचे असल्यास खालिल पदार्थ खाणे टाळावे –
साखर आणि गोड पदार्थ, तेलकट पदार्थ, तुपाचे पदार्थ, मिठाई, बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ, केक, आईस्क्रीम, चॉकलेट्स, स्नॅक्स, चिप्स, चहा, कॉफी, शीतपेये, जंकफूड, फास्टफूड इ. पदार्थ खाणे टाळावे.

हे सुद्धा वाचा..
वजन कमी करण्यासाठीच्या स्मार्ट टिप्स जाणून घ्या.
व्यायामाचे विविध प्रकार व व्यायामाचे फायदे
• ‎ व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

वजन आटोक्यात ठेवण्यासाठीच्या स्मार्ट टिप्स वजन कमी करण्याचे घरगुती उपाय मराठी पोट कमी करण्यासाठी व्यायाम video लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे वजन कमी करण्यासाठी काय करावे लागेल पोटाचा घेर कमी करण्याचे उपाय वजन कमी करने charbi kami karne upay in marathi वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत weight loss tips in marathi ramdev baba weight loss tips in marathi diet for weight loss in 7 days in marathi stomach loss tips in marathi yoga for weight loss in marathi ayurvedic medicines for weight loss in marathi exercise for weight loss in marathi language vajan kami karnyasathi diet vajan kami karayche upay marathi weight loss diet in marathi pdf book free


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.