मुतखडा आणि उपाय – मुतखडासाठी हे करा उपयुक्त उपाय..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

मुतखडा आणि उपाय :

मूतखड्यांची समस्या अत्यंत वेदनादायी असून हा त्रास अनेकांना होत असतो. लघवी करताना त्रास व जळजळ होणे, तीव्र वेदना पोटाकडे येऊन मूत्रमार्गाच्या दिशेने सरकणे आणि सोबत उलट्या व मळमळ होणे असे अनेक त्रास मुतखडामुळे होत असतात. त्यामुळे येथे मुतखडासाठी उपाय याविषयी माहिती दिली आहे.

मुतखडासाठी उपाय :

लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल –
एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल ग्लासभर पाण्यात मिसळून हे मिश्रण प्यावे. मुतखडासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे.

डाळिंबाचा रस –
डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते.

तुळस –
तुळसीच्या पानांचा रस सेवन केल्यास मूतखडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. यासाठी तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज काही दिवस घ्यावा. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.

पानफुटी –
पानफुटीची दोन पाने सकाळी चावून खाण्यामुळे मुतखड्याचे बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर निघून जाण्यास खूप मदत होते.

कांद्याचा रस –
दररोज सकाळी अनशापोटी कांदा किसून त्याचा चमचाभर रस नियमित सेवन केल्यास मूतखड्याचे बारीक कण होऊन ते लघवीवाटे निघून जातात.

शहाळ्याचे पाणी –
मुतखड्याचा त्रास असल्यास शहाळ्याचे पाणी जरूर प्यावे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढून मुतखडे सहज विरघळून निघून जाण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पाणी –
मुतखडे दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. यासाठी दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीला साफ होऊन मुतखडे निघून जाण्यास मदत होते.

मुतखड्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीच्या कार्यावरही होऊ शकतो यासाठी मुतखडा त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. मुतखड्यावरील आयुर्वेदिक उपचार विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Web title – mutkhada upay in Marathi.