मुतखड्याचा त्रास बऱ्याच लोकांना असतो. यासाठी ते नानाविध उपाय करून पाहतात, पण सहजरीत्या हा त्रास काही दूर होत नाही. यासाठी आम्ही येथे मुतखडा पडून जाण्यासाठी सर्वोत्तम उपायांची खाली माहिती दिली आहे.
मुतखडा बाहेर पडण्याकरिता हे करा उपाय :
ऍपल व्हिनेगर –
एक ग्लास पाण्यात दोन चमचे ऍपल व्हिनेगर मिसळावे व ते मिश्रण जेवणापूर्वी प्यावे. यातील उपयुक्त ऍसिडमुळे मुतखडाचे बारीक कण होऊन पडतात. मात्र रक्तदाब आणि मधुमेहाचे औषध घेत असलेल्या रुग्णांनी ऍपल व्हिनेगर पिणे टाळावे.
लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल –
ग्लासभर पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळून हे मिश्रण प्यावे. मुतखडा पडण्यास हा घरगुती उपाय खूप फायदेशीर आहे.
पानफुटी –
पानफुटीची दोन पानं सकाळी चावून खाण्यामुळे मुतखडा बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर पडतात.
डाळिंबाचा रस –
डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा रस पिणे किंवा डाळींबाचे दाणे खाणे मुतखडा पाडण्याकरिता उपयोगी असते.
तुळस –
तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज घेतल्यास काही दिवसात मुतखडा पडतो. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.
कुळथाचं कढण –
मुतखडा असल्यास आहारात कुळथाचं कढण किंवा हुलगे जरूर समाविष्ट करावे. कुळीथाचे कढण पिण्यामुळे मुतखडा बारीक होऊन पडून जातो.
कांद्याचा रस –
दररोज सकाळी अनशापोटी कांदा किसून त्याचा चमचाभर रस नियमित सेवन केल्यास मूतखड्याचे बारीक कण होऊन ते लघवीवाटे पडतात.