मूळव्याधीचा त्रास आणि त्यावरील उपाय :
बदललेली जीवनशैली, तिखट व मसाल्याचे पदार्थ अधिक खाणे, सततचे बैठे काम, लठ्ठपणा यासारख्या अनेक कारणांमुळे आज अनेकांना मूळव्याध होत आहे. मूळव्याधमध्ये गुदाच्या ठिकाणच्या शिरा सुजतात. त्यामुळे या त्रासात गुदप्रदेशी सूज व अतिशय वेदना होत असतात. त्यामुळे मूळव्याधवर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी मूळव्याधवरील उपयोगी उपाय सांगितले आहेत.
मूळव्याध त्रास कमी करण्याचे उपाय –
लिंबू आणि सैंधव मीठ –
मूळव्याधवर सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खाणे खूप फायदेशीर ठरते. याशिवाय ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाकून ते मिश्रण सकाळी उटल्यावर उपाशीपोटी प्यावे. 15 दिवस हा उपाय केल्यास मूळव्याधचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
जिरेपूड –
जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा बारीक केलेली जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. सकाळी हे मिश्रण पिल्यानंतर कमीत कमी एक तास तरी काही खाऊ नये. मूळव्याधवरील हा उपायही उपयुक्त आहे.
कोरपड –
कोरपडीच्या गरात सूज कमी करणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. त्यामुळे मुळव्याधमध्ये गुदाच्या ठिकाणी आलेली सूज व जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी गुदाच्या ठिकाणी थोडासा कोरपडीचा गर लावून हळूवारपणे मालिश करावी.
कच्चा मुळा –
कच्चा मुळा खाणेही मूळव्याधवर फायदेशीर असते. यासाठी मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे. याशिवाय किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट मूळव्याध वर लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.
सुरण कंदमुळ –
मूळव्याधवर सुरण हे कंदमुळ अत्यंत उपयुक्त ठरते. सुरण वाफवून केलेली भाजी व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो. सुरण कंदमुळ उकडून खाण्यात ठेवावे.
दुर्वा –
दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. मूळव्याधवरील हा उपायही लाभदायक ठरतो.
लोणी व खडीसाखर –
मूळव्याधमध्ये रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर दिवसातून तीन वेळा खावी.
साजूक तूप –
मूळव्याध असल्यास व पोट साफ होत नसल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल.
ताक –
जिरेपूड घालून ताक पिण्यामुळेही मूळव्याधचा त्रास लवकर कमी होतो.
हे सुध्दा वाचा – मूळव्याधची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about mulvyadh upay in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).
Good information, Thanks doctor
Thanks