मूळव्याध वर घरगुती उपाय आणि मूळव्याधवर घरगुती औषध उपचार

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Mulvyadh var upay in Marathi.

मूळव्याधीचा त्रास :

बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, बैठे काम यासारख्या अनेक कारणांमुळे आज अनेकांना मूलव्याधचा त्रास जाणवत आहे. मूळव्याधमध्ये गुदाच्या ठिकाणच्या शिरा सुजतात. त्यामुळे या त्रासात गुदप्रदेशी सूज व अतिशय वेदना होत असतात.

त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तही पडत असते. त्यामुळे मूळव्याधवर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते. यासाठी याठिकाणी मूळव्याध वर घरगुती उपाय आणि औषध उपचार याविषयी उपयुक्त माहिती येथे सांगितली आहे.

मूळव्याध वर घरगुती उपाय आणि उपचार :

लिंबू आणि सैंधव मीठ –
मूलव्याधवर सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खाणे खूप फायदेशीर ठरते. याशिवाय ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाकून ते मिश्रण सकाळी उटल्यावर उपाशीपोटी प्यावे. 15 दिवस हा घरगुती उपाय केल्यास मूळव्याधचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

जिरेपूड –
जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा बारीक केलेली जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. सकाळी हे मिश्रण पिल्यानंतर कमीत कमी एक तास तरी काही खाऊ नये. मूळव्याधवर जिरेपूड खुप उपयुक्त ठरते.

कच्चा मुळा –
कच्चा मुळा खाणेही मूळव्याधवर फायदेशीर असते. यासाठी मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे. याशिवाय किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट मूळव्याध वर लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.

सुरण कंदमुळ –
मूळव्याधवर सुरण हे कंदमुळ अत्यंत उपयुक्त ठरते. सुरण वाफवून केलेली भाजी व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो. सुरण कंदमुळ उकडून खाण्यात ठेवावे.

दुर्वा –
दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. मूळव्याधवर हा उपायही लाभदायक ठरतो.

लोणी व खडीसाखर –
मूळव्याधमध्ये रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर दिवसातून तीन वेळा खावी.

साजूक तूप –
मूळव्याध असल्यास व पोट साफ होत नसल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल.

ताक –
मूळव्याधीवर जिरेपूड घालून ताक पिणेही खूप लाभदायक असते यामुळे मूळव्याधचा त्रास लवकर कमी होतो.

तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून मूळव्याध वर औषध आणि उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.