CEO, हेल्थ मराठी नेटवर्क
चुकीचा आहार, वेळीअवेळी खाणे, बैठे काम, उगीचच मलप्रवृत्तीवेळी जास्त वेळ बसून राहणे, वारंवार कुंथून जोर करणे, तिखट, मसालेदार पदार्थांचे जास्त खाणे, पचायला जड पदार्थांचे वारंवार सेवन यासारख्या कारणांमुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो.
मूळव्याधमध्ये गुद्वारापाशी कोंब येऊन त्याठिकाणी सूज व वेदना होत असतात. तर काही वेळा शौचावाटे रक्तही पडत असते. भयंकर पीडा देणाऱ्या ह्या त्रासामुळे अनेकजण त्रासलेले असतात. त्यामुळे ह्याठिकाणी मूळव्याध रामबाण औषध माहिती येथे दिली आहे.
मूळव्याध रामबाण औषध :
एरंडाची दोन पाने थोडे मीठ घातलेल्या कोमट पाण्यातून स्वच्छ धुवावीत. त्यानंतर ती पाने बारीक कापून मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात अर्धा कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. स्वच्छ फडक्याच्या साहाय्याने मिश्रण गाळून घ्यावे. हा तयार केलेला रस सलग चार दिवस सकाळी उपाशीपोटी घ्यावा. मूळव्याधच्या त्रासाला हे खात्रीशीर गुणकारी रामबाण औषध आहे. मूळव्याधविषयी अधिक माहिती व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..
कॉपीराईट विशेष सूचना - वरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.
मुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)