मूळव्याध कोंब घरगुती उपाय (mulvyadh komb upay in marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

मूळव्याध कोंब :

आजकाल अनेकांना मूळव्याधीचा त्रास सतावत आहे. चुकीचा आहार, पचनास जड असणारे पदार्थ, तिखट व मसालेदार पदार्थ अधिक खाणे, वेळीअवेळी जेवण करणे, सतत बैठे काम, सततचा प्रवास ही प्रमुख कारणे मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरत असतात.

मूळव्याधीचा त्रासात शौचाच्या ठिकाणच्या शिरा सुजतात, त्याठिकाणी मूळव्याध कोंब किंवा मोड, गाठी आल्याचे जाणवते. शौचाच्या वेळी वेदना जाणवतात. त्याठिकाणी खाज व जळजळ होते. तर कधीकधी शौचावाटे रक्तही पडत असते. अशी लक्षणे मूळव्याधमध्ये असतात. याठिकाणी मूळव्याध कोंब घरगुती उपाय आणि औषध उपचार याविषयी माहिती खाली दिली आहे.

मूळव्याध कोंब घरगुती उपाय :

कच्चा मुळा –
किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट मूळव्याधच्या कोंब किंवा मोडांवर लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
कच्चा मुळा खाणेही हा मूळव्याधवर उपयुक्त असतो. यासाठी मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे.

तीळ –
तीळ कुटून त्याची पेस्ट मूळव्याधच्या मोडांवर लावल्यास, आराम मिळतो. तसेच अर्धा चमचाभर तिळ लोण्यामध्ये एकत्र करून खाणेही उपयुक्त ठरते.

मोहरी –
मुळव्याध कोंब किंवा मोडाचा त्रास होत असल्यास, 1 चमचा मोहरी आणि 2 चमचे दूध यांची बारीक पेस्ट करायची आणि ती दिवसातून 3-4 वेळा मोडावर लावायची, 15-20 दिवसात पूर्ण बरे होतात.

बर्फाचा शेक –
मुळव्याधमध्ये गुदद्वाराजवळ कोंब येऊन सूज व वेदना होत असल्यास त्यावर बर्फाचा शेक खूप उपयोगी ठरतो.

तज्ञ डॉक्टरांकडून मूळव्याध वरील आयुर्वेदिक औषध उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.