MRI टेस्ट म्हणजे काय?

5861
views

एम. आर. आय. टेस्ट :
MRI Test info in Marathi
(मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग)एम. आय. आर. मध्ये स्ट्रॉंग चुंबक व रेडिओ लहरींचे पल्सेस वापरल्या जातात. यात वापरण्यात येणार्या रेडीओ लहरी या एका स्ट्रॉंग चुंबकीय फील्डमधून पास होतात. त्यामुळे शरीरातील आतील अवयवांच्या अगदी रिमार्केबल अशा चांगल्या प्रतिमा निघतात.

कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरतात?
एम. आर.आय हे मुख्यत्वे करून सॉफ्ट टिश्युजच्या एरीया जसे मसल्स (स्नायू) नर्व्हज, मेंदु व इतर अवयवांच्या परीक्षणासाठी उपयोगात येतं. त्यामुळे मेंदुचे विकार, नाडयांचे विकार, स्नायुंचे विकार, मनक्याचे विकारांच्या निदानासाठी उपयुक्त. एम आर आय हे गेल्या २५ वर्षातील अतिशय महत्त्वाचे असे ऍडव्हॉन्स इमेजिंग तंत्र आहे.

किती वेळ लागतो?
एम आर आय च्या परीक्षणासाठी जवळपास पूर्णपणे 30 ते 60 मिनीट लागू शकतात. एम आर आय एक्झामसाठी ज्या टेबलावर आपण झोपतो तो चुंबकीय क्षेत्रात (मॅग्नेटिक फील्ड) मध्ये सरकतो किंवा स्लाईड होतो. या इक्वीपमेंटद्वारे वेगवेगळ्या कोनातून भरपूर प्रतिमा (इमेजेस) काढल्या जातात. हे मशीन खूप मोठा आवाज करतं, जसे आदळल्यासाखा (बँगिंग), बजींग, टकटक वगैरे!! यामुळे कानात घालून दिलेल्या इअरप्लगमुळे आवाजाची तीव्रता कमी होते.

परीक्षणासाठी विशेष सुचना..
या परीक्षणासाठी न हालता शांत पडून राहाणं गरजेच असतं. ज्यांच्यासाठी झोपून राहाणं किंवा पडून राहाणं त्रासदायक असतं त्यासाठी त्यांच्या फिजिशीयनशी आधी चर्चा करून मेडिकेशन किंवा सिडेशन (झोपेचं औषध) घेता येऊ शकेल. यासंबंधी तुम्ही तिथे कार्यरत असणाऱ्या तंत्रज्ञाशीही बोलून घ्यावे.
ज्या टेबलवर आपण झोपलेलो असतो तो मोठ्या चुंबकाचा बनलेला असतो. त्यामुळे सैलसर कपडे (मेटल फ्री) किंवा त्यांनी दिलेला गाऊन घालणे आपल्या सुरक्षिततेसाठी सोयीचे असते. याशिवाय जर कुठली स्पेशल तयारीची आवश्यकता भासत असेल तर परीक्षणाआधी ऍडव्हान्समधे सांगितल्या जातं. MRI Scan चा सर्वात मोठा ऍडव्हांटेज म्हणजे कोणत्याही प्लेनमध्ये इमेजेस (प्रतिमा) काढता येतात.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.