नवजात बालकांसाठी स्तनपान महत्व

5580
views

नवजात बालकांसाठी स्तनपान महत्व :
स्तनपानातून बालक आणि माता या दोहोंस विशेष लाभ होत असतात. स्तनपान हे पोषणाचा ए स्रोत म्हणण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. बाळाला पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करवणं सर्वोत्तम.

स्तनपानातून बालकास होणारे लाभ :

  • बालकाचे पोषण होते, सहा महिन्यांत केवळ स्तनपान करवणं सर्वोत्तम कारण त्यामुळं पचनाशी निगडीत समस्यांपासून संरक्षण मिळतं. मातेचे दुध पचायला सोपं असतं आणि बध्दकोष्ठता होत नाही. त्यामुळं बाळाच्या आतड्यांची प्रतिकारशक्ती वाढते.
  • मातेच्या दुधामध्ये अनेक पोषक घटकद्रव्ये असतात. त्यामुळे बालकाचे शारीरीक, बौद्धिक, मानसिक विकास होण्यास स्तनपानामुळे मदत होते.
    रोगप्रतिकारक घटकांनी स्तन्ययुक्त असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होते. शिवाय त्याची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. त्याचे साथीचे रोग, दमा आणि कानाच्या संक्रमण, एलर्जीसारख्या अनेक रोगांपासून रक्षण होते.
  • स्तनपान करवलेल्या बाळांना नंतरच्या वयात लठ्ठपणा येत नाही असं संशोधनात आढळून आलं आहे – याचं कारण असं की त्यांना भूक लागते तेव्हाच ते अन्न घेतात त्यामुळं पहिल्यापासूनच अतिरीक्त वजन वाढण्याची शक्यता नसते.
  • बालवयात होणारा रक्तपेशीचा कर्करोग, टाईप-एक मधुमेह आणि नंतरच्या आयुष्यात उच्च रक्तदाब टाळण्याशी देखील स्तनपानाचा संबंध आहे.
  • बौद्धिक विकास होतो. मेंदू तल्लख बनतो, स्मरणशक्ती वाढते यासाठी नवजात बालकांस पहिल्या 6 महिन्यापर्यंत मातेचे दुधच द्यावे.

स्तनपानातून मातेस होणारे लाभ :

  • स्तनपान करवणा-या नवमातांचं वजन नंतर लवकर कमी होतं. त्याचप्रमाणं प्रसुतीनंतरचा तणाव आणि रक्तस्त्राव कमी करायला त्यामुळं मदत होते.
  • प्रसुतीनंतर नियमितपणे स्तनपान करवल्यास स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी करता येते – बाळाच्या संगोपनाचा काळ जितका अधिक तेवढा धोका कमी होतो.
  • आई आणि बाळ यांच्यात भावनिक नातं निर्माण होतं.

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.