Dr Satish Upalkar’s article about yellow urine causes & treatments in Marathi.
लघवी पिवळी होणे –
बऱ्याचवेळा पिवळ्या रंगाची लघवी होते. लघवी पिवळी होणे ही एक सामान्य अशीच बाब असते. लघवीचा रंग हा शरीरातील पाण्याचे प्रमाण, घेतलेला आहार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात लघवी पिवळी होण्याची कारणे व उपाय याची माहिती सांगितली आहे.
पिवळी लघवी का व कशामुळे होते ..?
लघवीला येणारा पिवळा रंग हा प्रामुख्याने युरोक्रोम या रंगद्रव्यामुळे येत असतो. याला यूरोबिलिन असेही म्हणतात. आपण जेंव्हा पुरेसे पाणी पितो तेंव्हा या गडद पिवळ्या रंगद्रव्यात पाणी मिसळते. त्यामुळे तेंव्हा फिकट पिवळ्या रंगाची लघवी होते. तेच जर शरीरातील पाणी कमी झाल्यास गडद पिवळ्या रंगाची लघवी होते.
लघवी पिवळी होण्याची कारणे –
- पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरारीतल पाणी कमी झाल्यास सतत लघवी पिवळी होऊ शकते.
- ताप, खोकला अशा आजारांमुळे लघवी पिवळी होऊ शकते.
- व्हिटॅमिन-B2, B12, व्हिटॅमिन-C युक्त आहार अधिक खाण्यामुळे किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या औषधे घेत असल्यास लघवी पिवळी होते.
- वेदनाशामक औषधे, अँटीबायोटिक औषधे घेतल्याने पिवळी लघवी येते.
- किडनी आणि यकृताच्या आजारांमुळे लघवी पिवळी होऊ शकते.
- मूत्रमार्गातील इन्फेक्शनमुळेही लघवी पिवळी होऊ शकते.
पिवळी लघवी येत असल्यास काळजीचे कारण केंव्हा असते ..?
फिकट पिवळी किंवा पिवळी लघवी होणे ही सामान्य बाब आहे. मात्र जर काळपट किंवा चॉकलेटी रंगाची लघवी होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशावेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. तसेच लाल, हिरव्या किंवा निळ्या रंगाची लघवी झाल्यास त्याकडेही दुर्लक्ष करू नये.
पिवळी लघवी होणे यावरील उपाय –
उपाय क्रमांक 1 –
पिवळी लघवी येत असल्यास दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीला साफ व फिकट होते. शहाळ्याचे पाणी, ताज्या फळांचा रस, उसाचा रस असे द्रवपदार्थ देखील यावेळी प्यावेत.
उपाय क्रमांक 2 –
लघवी पिवळी होत असेल तर कुळथाचे कढण आहारात समाविष्ट करावे. यामुळे लघवीला साफ होते. हे उपाय आपण करू शकता.
हे सुध्दा वाचा – मूतखडा होण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..
In this article information about Yellowing of urine Causes and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.