किडनी स्टोनवरील उपाय – किडनी स्टोनचा त्रास असल्यास हे करा उपाय..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

किडनी स्टोन आणि उपाय :

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत कॅल्शियम क्षार, युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोनची समस्या होत असते. किडनी स्टोनमुळे अटीपोटात किंवा कंबरेत अतिशय वेदना होत असतात. यासाठी येथे किडनी स्टोनवर उपाय याविषयी माहिती दिली आहे.

किडनी स्टोनवर उपाय :

ऍपल व्हिनेगर –
दोन चमचे ऍपल व्हिनेगर एक ग्लास मिसळावे व ते मिश्रण जेवणापूर्वी प्यावे. यातील उपयुक्त ऍसिडमुळे किडनी स्टोनचे बारीक कण होऊन ते निघून जातात.

लिंबु रस आणि ऑलिव्ह ऑईल –
एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल ग्लासभर पाण्यात मिसळून हे मिश्रण प्यावे. किडनी स्टोनसाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे.

डाळिंबाचा रस –
डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा रस किडनी स्टोनवरील प्रभावी उपाय ठरतो. 

तुळस –
तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज घेतल्यास काही दिवसात किडनी स्टोनपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.

टरबूज –
किडनी स्टोनपासूनच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी टरबूजचे सेवन देखील फायदेशीर ठरू शकते. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. टरबूजमध्ये सायट्रिक ऍसिड आणि पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असते. यामुळे किडनी स्टोन निघून जाण्यासाठी मदत होते.

कुळथाचं कढण –
किडनी स्टोन्सचा त्रास असल्यास आहारात कुळथाचं कढण किंवा हुलगे जरूर समाविष्ट करावे. कुळीथाचे कढण पिण्यामुळे किडनी स्टोन बारीक होऊन पडून जातो.

कांदा –
सकाळी अनशापोटी कांद्याचा चमचाभर रस सेवन केल्यास स्टोनचे बारीक खडे होतात आणि ते लघवीवाटे बाहेर पडतात.

चाकवत भाजी –
किडनी स्टोनवर चाकवत भाजीही उपयुक्त असते. यासाठी चाकवताची काही पाने पाण्यात उकळत घालावीत. हे पाणी गाळून दिवसातून दोन वेळा प्यावे.

शहाळ्याचे पाणी –
किडनी स्टोनचा त्रास असल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढून किडनी स्टोन सहज विरघळून निघून जाण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पाणी –
किडनी स्टोनवर सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. यासाठी दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीला साफ होऊन किडनी स्टोन विरघळून निघून जाण्यास मदत होते.

मुतखड्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीच्या कार्यावरही होऊ शकतो यासाठी मुतखडा त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. मुतखड्यावरील आयुर्वेदिक उपचार विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Web title – Kidney stone var upay in Marathi.