मुतखडा लक्षणे – किडनी स्टोनमध्ये कोणती लक्षणे असतात ते जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

किडनी स्टोन लक्षणे :

अनेकांना मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या भेडसावत असते. मुतखड्याचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असा असतो. लघवीत कॅल्शियम ऑक्सलेट आणि यूरिक ऍसिड सारख्या पदार्थांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे मुतखड्याची समस्या होत असते. याठिकाणी मुतखडा लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती दिली आहे.

मुतखड्याचा आकार लहान असल्यास सहसा जास्त त्रास होत नाही, परंतु जर मुतखड्याचा आकार मोठा असल्यास मूत्र प्रणालीमध्ये अडथळा येऊ शकतो. अशावेळी त्यामुळे पोटात किंवा कंबरेत असह्य वेदना होणे, उलट्या व मळमळ होणे असे त्रास होऊ शकतात.

मुतखडा लक्षणे :

• ज्या बाजूच्या किडणीत मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होणे,
• वारंवार लघवीस झाल्यासारखे वाटणे,
• ‎ लघवी करताना जळजळ होणे,
• ‎ लघवी करताना त्रास होणे,
• ‎ थेंब थेंब लघवी होणे, काहीवेळा लघवीत रक्त येणे,
• ‎तसेच मुतखड्यामुळे लघवी थुंबून राहिल्याने मळमळ व उलट्या होणे, ताप येणे यासारखी लक्षणे जाणवतात.

मुतखडा असल्यास हे करा उपाय..

• दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीवाटे मुतखडे निघून जाण्यास मदत होते.
• दररोज चमचाभर लिंबाच्या रसात एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळून हे मिश्रण प्यावे.
• दररोज तुळशीचा रस किंवा पाने चावून खल्यानेही किडनी स्टोन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
• सकाळी उपाशीपोटी पानफुटीची दोन पाने चावून खावीत. याच्या नियमित सेवनाने मुतखडे बारीक होऊन लघवीवाटे बाहेर पडतात.
• डाळींबाचा रस किंवा शहाळ्याचे पाणी पिणेही किडनी स्टोनवर उपयोगी असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

मुतखड्यावरील उपचाराविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Web title : Kidney stone symptoms in Marathi.