किडनी स्टोनवरील घरगुती उपाय यांची माहिती मराठीत जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

किडनी स्टोन आणि घरगुती उपाय :

किडनी स्टोन हा किडनी संबंधित एक सामान्य असा त्रास आहे. जेव्हा लघवीत यूरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सलेट्स यासारख्या खनिज व क्षार यांचे प्रमाण अधिक वाढल्यास किडनी स्टोन तयार होतात. याठिकाणी किडनी स्टोन घरगुती उपाय याविषयी माहिती मराठीत दिली आहे. यामुळे नैसर्गिकरित्या किडनी स्टोन निघून जाण्यास मदत होईल.

किडनी ही आपल्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. रक्त शुद्ध आणि फिल्टर करून अपायकारक घटक शरीराबाहेर लघवीवाटे काढून टाकण्यासाठी तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची योग्य पातळी राखण्यासाठी किडनीचे महत्त्वाचे कार्य असते. म्हणूनच आपण नेहमी किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपले शरीर निरोगी राहू शकेल.

लहान आकाराचे किडनी स्टोन हे कोणत्याही त्रासाशिवाय लघवीवाटे बाहेर पडू शकतात. तर मध्यम किंवा मोठ्या आकाराचे किडनी स्टोन सहजासहजी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे ओटीपोटापासून ते कंबरेपर्यंत असह्य वेदना होतात. याशिवाय वारंवार लघवीला होणे, लघवीला जळजळणे, लघवीत रक्त पडणे, मळमळ व उलट्या होणे यासारखे त्रास यामध्ये होत असतात.

किडनी स्टोनवर घरगुती उपाय :

ऍपल व्हिनेगर –
दोन चमचे ऍपल व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळावे व ते मिश्रण जेवणापूर्वी प्यावे. ऍपल व्हिनेगरला किडणीसाठी सुपरफूड म्हणतात. हे किडन्या स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त असते. यातील उपयुक्त ऍसिडमुळे किडनी स्टोनचे बारीक कण होऊन निघून जातात. मात्र रक्तदाब आणि मधुमेहाचे औषध घेत असलेल्या रुग्णांनी ऍपल व्हिनेगर पिणे टाळावे.

लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल –
ग्लासभर पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळून हे मिश्रण प्यावे. किडनी स्टोनसाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर आहे.

डाळिंबाचा रस –
डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा रस पिणे किंवा डाळींबाचे दाणे खाणे किडनी स्टोनवर प्रभावी असते. 

पानफुटी –
पानफुटीची दोन पानं सकाळी चावून खाण्यामुळे किडनी स्टोनचे बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर निघून जाण्यास खूप मदत होते.

तुळस –
तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज घेतल्यास काही दिवसात किडनी स्टोनपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.

कांद्याचा रस –
दररोज सकाळी अनशापोटी कांदा किसून त्याचा चमचाभर रस नियमित सेवन केल्यास किडनी स्टोनचे बारीक कण होऊन ते लघवीवाटे निघून जातात.

कुळथाचं कढण –
किडनी स्टोन्सचा त्रास असल्यास आहारात कुळथाचं कढण किंवा हुलगे जरूर समाविष्ट करावे. कुळीथाचे कढण पिण्यामुळे किडनी स्टोन बारीक होऊन पडून जातो.

शहाळ्याचे पाणी –
किडनी स्टोनचा त्रास असल्यास शहाळ्याचे पाणी जरूर प्यावे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढून किडनी स्टोन सहज विरघळून निघून जाण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पाणी –
किडनी स्टोनवर सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. यासाठी दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीला साफ होऊन अपायकारक घटक बाहेर निघून जाईल व किडनी स्टोन बारीक होऊन पडून जाण्यास मदत होईल.

मुतखड्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीच्या कार्यावरही होऊ शकतो यासाठी मुतखडा त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. मुतखड्यावरील आयुर्वेदिक उपचार विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Web title – Kidney stone gharelu upay in Marathi.