प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

1085
views

केवळ 330 रूपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक विमा योजना आहे. कोणत्याही कारणाने मृत्यू आल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना एलआयसी किंवा इतर जीवन विमा कंपन्यांमार्फत देऊ केली जाईल. दरवर्षी नुतनीकरण आवश्यक आहे. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल. 18 ते 50 वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांकांद्वारे योजनेत सहभागी होता येईल. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. पुढील वर्षाच्या नुतनीकरणाचा अर्ज 31 मेपर्यंत देणे आवश्यक राहील.

सहभाग कालावधी :
या योजनेत विमा संरक्षण हे 1 जून ते 31 मे या कालावधीत एक वर्षासाठी राहील. दरवर्षी 31 मे किंवा त्यापूर्वी कधीही प्रीमियम भरता येईल. त्याची वाढीव मुदत ही 31 ऑगस्ट 2015 ही पहिल्या वर्षासाठीच राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सुरुवातीला 3 महिन्यापर्यंत (31 नोव्हेंबर 2015) वाढवू शकते. नवीन विमा घेणाऱ्याला पुढच्या वर्षी सामील होता येणार आहे.
योजनेविषयी महत्वाचे

उशिरा नोंदणी करणारे किंवा 31 नोव्हेंबरनंतर नोंदणी करतील त्यांना संपूर्ण वार्षिक प्रीमियम भरून विहीत नमुन्यात स्वत:चे आरोग्य चांगले असल्याबद्दचा दाखला सादर करावा लागेल.तसेच कोणत्याही वेळी या योजनेतून बाहेर पडलेल्या व्यक्तिंना पुन्हा योजनेत सामील व्हायचे असेल तर विहीत नमुन्यात स्वत:चे आरोग्य चांगले असल्याबद्दचा दाखला सादर करावा लागेल. शिवाय नोंदणी तारखेनंतर किंवा पूर्वी विमाधारकाला कोणताही गंभीर आजार नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.वयाची 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर या योजनेत सहभागी होता येणार नाही.

शिवाय आपले विमा संरक्षण आपोआप संपुष्टात येईल. तथापि, योजनेत सहभागी झाल्यानंतर आणि वयाची 50 वर्ष पूर्ण केल्यानंतरही विमाधारकाला योजना पुढे सुरु ठेवण्याची इच्छा असल्यास विमाधारक त्याच्या वयाच्या 55 वर्षापर्यंत योजनेतील हप्ते भरून विमा संरक्षण वाढवू शकतो.

विमाधारकाचा कुठल्याही कारणाने 55 वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 2 लाख रुपयांची विमा भरपाई मिळेल. संयुक्त नावाने बचतखाते असलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही योजनेत सहभाग घेता येईल. विमाधारकाने दोन ठिकाणी विमा भरला असेल तर कोणत्याही एका ठिकाणचाच लाभ मिळेल व प्रीमियम परत मिळणार नाही.

विमा भरपाई :

फायद्याचा तपशील मिळणारी विमा रक्कम
विमा धारकाच कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये

 

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.