जननी सुरक्षा योजनेची मराठीत माहिती (Janani suraksha yojana in Marathi)

Janani suraksha yojana in Marathi

जननी सुरक्षा योजना केंद्रशासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 2005-06 या वर्षी सुरु केली आहे.

योजनेचे उद्दिष्ट –

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणा-या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे असे आहे.

लाभार्थी पात्रता –
• दारिद्रय रेषेखालील सर्व लाभार्थी
• ‎अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती माता (दारिद्रय रेषेखाली नसलेल्या देखील)
• ‎सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी 19 वर्षे असावे.
• ‎सदर योजनेचा लाभ 2 जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

योजनेअंतर्गत लाभार्थीस दिला जाणारा लाभ –
(1) प्रसुती घरी झाली तर रु. 500/- (रुपये पाचशे फक्त) एवढा लाभ लाभार्थींना देय राहतो.
(2) शहरी भागातील रहिवासी लाभार्थीस संस्थेत प्रसुती झाल्यानंतर रु. 600/- प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देण्यात येतात.
(3) ग्रामीण भागातील रहिवासी लाभार्थीस संस्थेत प्रसुती झाल्यानंतर रु. 700/- प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देण्यात येतात.
(4) सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस रु. 1500/- चा लाभ देण्यात येतो.
वरील लाभ हा धनादेशाद्वारे देण्यात येतो.
उपकेंद्रस्तरावर जननी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य सेविकांच्या नावे सब-अकाउंट उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच सदर अकाऊंट मधून लाभार्थींना लाभ देण्याच्या धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार आरोग्य सेविका यांना देण्यात आलेले आहेत.

सेवा केंद्रे –
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका-नगरपालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, शासनमान्य खाजगी रुग्णालये या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात येतो.
जननी सुरक्षा योजने अंतर्गत् “आशा” कार्यकर्ती लाभार्थीस आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्यास आदिवासी व बिगरआदिवासी कार्य क्षेत्रातील “आशा” कार्यकर्तीस अनुक्रमे रु. 600/- व रु. 200/- देय आहे.

Janani Suraksha Yojana is an Indian Government scheme proposed by the Government of India.

© लेखक- डॉ. सतीश उपळकर
वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..