जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची माहिती

980
views

Janani shishu suraksha karyakram

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम –
महाराष्ट्र राज्याचा सध्याचा मातामृत्यु दर 104 व बालमृत्यु दर 31 आहे. देशाच्या तुलनेमध्ये हा दर कमी असला तरीही महाराष्ट्र राज्यासारखा प्रगत राज्याचा विचार करता हा दर खूप जास्त आहे. हे मृत्यु दर कमी करण्यासाठी माता व बालकांना वेळीच उपचार मिळणे ही महत्वाची बाब आहे. यास अनुसरुन केंद्र सरकारने जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रम जाहिर केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे –
◦ गरोदरमातांना नोंदणी, तपासणी, औषधोपचार, बाळंतपणे या सर्व सेवा मोफत पुरविणे. यामध्ये प्रयोगशाळा तपासण्या, सिझेरियन सेक्शन, रक्त संक्रमण या बाबींचाही समावेश आहे.
◦ नवजात अर्भकांना 0-30 दिवसांपर्यंत उपचारासाठी दाखल झाल्यास नोंदणी, तपासणी व औषधोपचार या सेवा मोफत पुरविणे.
◦ गरोदर मातांना बाळंतपणाच्या वेळी व अर्भकांना (0 ते 30 दिवस) (घरातून रुग्णालय, रुग्णालय ते रुग्णालय (संदर्भ सेवेसाठी) आणि रुग्णालय ते घर अशी वाहतूक सेवा मोफत पुरविणे.
◦ गरोदरमाता व अर्भक रुग्णालयात असेल त्या कालावधीसाठी आहारसेवा मोफत पुरविणे.

गरोदर मातांना द्यावयाच्या मोफत आरोग्य सुविधा –
गरोदर मातांना सर्व शासकिय आरोग्य संस्थांमध्ये खालील सुविधा मोफत देण्यात याव्यात
मोफत प्रसुती तसेच मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया.
प्रसुती संदर्भातील औषधे व लागणारे साहित्य मोफत पुरविणे.
प्रयोगशाळेतील आवश्यक त्या तपासण्या मोफत देणे.
प्रसुती पश्चात मातेला मोफत आहार देणे.
मोफत रक्तसंक्रमण देण्यासाठी मोफत रक्त पुरवठा
प्रसुतीसाठी घरापासून दवाखान्यापर्यंत मोफत वाहन व्यवस्था
एका आरोग्य संस्थेतून पुढील संदर्भ सेवा देण्यासाठी दुस-या आरोग्य संस्थेत पोहोचविण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था
प्रसुती पश्चात आरोग्य संस्थेतून घरी पोहोचविण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था
शासकिय आरोग्य संस्थेमध्ये गरोदर मातेस कोणतीही फी आकारण्यात येवू नये.

नवजात अर्भकांन (0-30 दिवस) द्यावयाच्या मोफत आरोग्य सुविधा –
नवजात अर्भकाच्या उपचारा संदर्भातील औषधे व लागणारे साहित्य मोफत पुरविणे.
प्रयोगशाळेतील आवश्यक त्या तपासण्या मोफत देणे.
मोफत रक्तसंक्रमण देण्यासाठी मोफत रक्त पुरवठा
घरापासून दवाखान्यात मोफत वाहन व्यवस्था
एका आरोग्य संस्थेतून पुढील संदर्भ सेवा देण्यासाठी दुस-या आरोग्य संस्थेत पोहोचविण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था)
आरोग्य संस्थेतून घरी पोहोचविण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था
शासकिय आरोग्य संस्थेमध्ये नवजात अर्भकास कोणतीही फी आकारण्यात येवू नये.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.