वंधत्व निवारण उपाय आणि टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय?

19407
views

वंधत्व निवारण उपाय आणि टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय?
कुठल्या ना कुठल्या वंध्यत्व समस्येमुळे मूल होऊ न शकणाऱ्या दाम्पत्यांना आपल्या सामाजिक परिस्थितीत आजही बराच ताण सहन करावा लागतो. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अशा अनेक दाम्पत्यांच्या वाटय़ाला आज अपत्यप्राप्तीचा आनंद आला आहे किंवा येण्याची आशा निर्माण झाली आहे. वंधत्व निवारण करणाऱ्या आधुनिक उपचारांविषयी असणाऱ्या समज- गैरसमजांबद्दल जाणून घेऊया..

प्रश्न : डॉक्टरांनी सांगितलं आहे, माझे स्त्रीबीज वेळेवर तयार होत नाहीत याचा नेमका अर्थ काय ?
डॉक्टर :
ह्याचा अर्थ तुम्हाला PCOS नावाचा आजार असू शकतो. ह्यामध्ये शरीरातील संप्रेरकमध्ये बदल होतो व अंडाशयावरती सूज येते.

प्रश्न : PCOS म्हणजे काय?
डॉक्टर :
‘पीसीओएस’ मुळे गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे परिपक्व स्त्रीबीज तयार होऊ शकत नाही. त्यामुळे, एक तर स्त्रीयांमध्ये वंधत्वाची समस्या निर्माण होते किंवा संबंधित स्त्री गरोदर राहिल्यास तिला गर्भपाताचा धोका अधिक असतो. या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (पीसीओएस) असे म्हटले जाते.
‘पीसीओएस’ हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक प्रमुख कारण बनले आहे.

प्रश्न : Pregnancy साठी प्रत्येक पेशंटला IVF / टेस्ट टयूब ची गरज असते का?
डॉक्टर :
गर्भधरणा न होण्याची अनेक कारणे असतात. प्रत्येक पेशंटला IVF / Test tube Baby च्या उपचार पद्धतीची गरज नसते. साध्या औषधोपचारांनी बर्याच पेशंटना गर्भधारणा होऊ शकते. दिलेली उपचारपद्धती बरोबर आहे का? याचा पेशंटनी विचार करायला हवा आणि त्याबदद्ल मनात कोणतीही शंका न ठेवता डॉक्टरांना प्रश्न विचारून शंका निरसन करायला हवे. तरच उपचारपद्धतीचा पेशंटला फायदा होतो.

प्रश्न : IVF / टेस्ट टयूब बेबी म्हणजे काय?
डॉक्टर :
IVF ( In Vitro Fertilization) म्हणजेचं टेस्ट टयूब बेबीमध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 व्या दिवसापासून इंजेक्शन सुरू होतात जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात मध्ये एक पाळी येते आणि दुसऱ्या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरू करतात. पाळीच्या 9 व्या दिवसापासून Follicular Study करून अंडाशयातील Follicules वाढ 18 मी. मी. पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून सुईने बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर कोणतीही शत्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली अंडी आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर मीलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ Incubator मध्ये 2-3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रूजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते.

प्रश्न : Follicular Study म्हणजे काय?
डॉक्टर :
Follicular Study यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात जे अंडी (बीजांडे) तयार होतात ज्यांचा सोनोग्राफी करून अभ्यास केला जातो. यामध्ये 4-5दिवस रोज किंवा दिवसा आड सोनोग्राफी केली जाते. अंडाशयामध्ये बीजांडाभोवती द्रव्य असते आणि त्याचा आकार वाढत असतो. तो 18 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त झाला आणि गर्भपिशवीच्या आतील आवरणाची जाडी 8 मी.मी. पेक्षा जास्त झाली की गर्भधारणा होण्याची शक्यता खूप असते. अशा वेळी अंडाशयातून बीजांड बाहेर पडण्यासाठी संप्रेरकाचे (Hormone) चे इंजेक्शन दिले जाते आणि त्यानंतर 40 तासांनी जोडप्याला गर्भ राहण्यासाठी प्रयत्न करायला सांगतात.

प्रश्न : टेस्ट टयूब बेबी हा पर्याय सर्वात शेवटी, उशिरा घ्यावयाचा निर्णय आहे?
डॉक्टर :
नाही. टेस्ट ट्यूब बेबी हा पर्याय खूप उशिरा निवडल्यास त्याचा यशस्वी होण्याचा दर कमी असतो.

प्रश्न : टेस्ट टयूब बेबी करताना दुसऱ्याचे वीर्य वापरतात हे खरे आहे का?
डॉक्टर :
IVF / Test tube Baby च्या संदर्भात सगळ्यात मोठा गैरसमज असतो की बीजांड अथवा शुक्रजंतू दुसऱ्याचे वापरले जाते. हा समज चुकीचा आहे. पती आणि पत्नीचेच शुक्रजंतू व बीजांड वापरले जाते. पतीमध्ये किंवा पत्नीमध्ये शुक्राणु आणि बीजांड तयार होत नसेल तरचं दुसऱ्याचे शुक्रजंतू आणि बीजांड वापरण्याची गरज असते आणि ते करताना सुध्दा पती आणि पत्नी दोघांची संमती लागते.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

प्रश्न : टेस्ट टयूब बेबी केल्यानंतर गर्भपात होतो का?
डॉक्टर :
असे जरूर नाही. नॉर्मल प्रमाणात गर्भपाताचा जेवढा धोका आहे तेवढाचं धोका यातही आहे.

प्रश्न : टेस्ट टयूब बेबी केली तर जुळे मुले होतात?
डॉक्टर : प्रत्येक वेळेस असे गरजेचे नाही. कधी-कधी जुळे किंवा तीळेही राहू शकतात किंवा फक्त एकाच गर्भ राहतो.

प्रश्न : टेस्ट टयूब बेबीने जन्माला आलेली मुले सर्वसाधारण मुलासारखी असतात?
डॉक्टर :
होय. टेस्ट टयूब बेबीद्वारे जन्माला आलेली मुले ही सर्वसाधारण मुलासारखी असतात.

प्रश्न : IUI म्हणजे काय?
डॉक्टर :
IUI ( Intra uterine Insemination) यामध्ये गर्भ पिशवीच्या आतमध्ये पतीचे वीर्य Canula ने सोडले जाते. स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गोळ्या अथवा इंजेक्शन देऊन अंडाशयात अंडी तयार करतात. त्याचे Follicular Study करून 36 तासानंतर IUI केले जाते. पतीच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असली तरी या पध्दतीमुळे फायदा होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

प्रश्न : ICSI म्हणजे काय?
डॉक्टर :
(ICSI (Intra Cytoplasmic Sperm Injection) ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या अतिशय कमी आहे त्या जोडप्यासाठी याचा उपयोग होतो. या प्रकारात IVF सारखीच प्रक्रिया असते. फक्त शुक्रजंतू हे बीजांडावर न सोडता आतमध्ये इंजेक्शनने सोडतात. शुक्रजंतूंची संख्या चांगली असेल तर या प्रक्रियेची आवश्यकता नसते.

प्रश्न : Donor Sperm म्हणजे काय?
डॉक्टर :
पतीच्या वीर्यामध्ये शुक्रजंतू नसतील (Azoospermia) आणि वृषणामध्ये (Testes) शुक्रजंतू तयार होत नसतील तर पती आणि पत्नीच्या लेखी संमती नंतर दुसऱ्याचे शुक्रजंतू वापरणे या प्रकाराला Donor Sperm वापरणे असे म्हणतात. यासाठी लागणारे शुक्रजंतू हे Sperm Bank मधून घेतले जातात. पतीची उंची, वर्ण, डोळ्याचा रंग आणि रक्तगट यांच्याशी साम्य असलेले Donor निवडून मगच त्याचा वापर केला जातो. या मध्ये Donor ची HIV test, VDRL Test केली जाते आणि त्याचे sample 6 महिन्यांकरता गोठवलेल्या अवस्थेत ठेवले जाते. त्यानंतर Donor बोलावून परत या सगळ्या Test केल्या जातात आणि सगळे Reports चांगले आल्यास 6 महिन्यांकरता गोठवून ठेवलेले शुक्रजंतू वापरले जातात. यामुळे वेगवेगळे आजार संक्रमित होण्याची शक्यता कमी होते. अशा प्रकारे राहिलेला गर्भ इतर गर्भासारखाच सामान्य असतो.

प्रश्न : Donor Oocytes कधी वापरतात?
डॉक्टर :
पुरूषांमध्ये शुक्रजंतूंची कमी असते त्याचप्रमाणे स्त्रीमध्ये ही अंडाशयाचे काम कमी झालेले असेल तर बीजांड तयार होत नाहीत. यावेळी दुसऱ्या स्त्रीच्या अंडाशयातील अंडी वापरून गर्भ बनतो तो गर्भ पत्नीच्या गर्भपिशवीत वाढवून त्या स्त्रीला आई होण्याचे सुख देता येते. या प्रकारात पतीचे शुक्रजंतू वापरले जातात.

प्रश्न : Embryo Donation म्हणजे काय?
डॉक्टर :
पती आणि पत्नी या दोघांमध्ये कमतरता असेल शुक्रजंतू आणि बीजांड दोन्ही तयार होत नसतील तर दुसऱ्या जोडप्यांचे गर्भ संबंधित स्त्रीच्या गर्भ पिशवीत सोडले जातात. यामुळे स्त्री गर्भवती राहू शकते. या प्रकारात दोन्ही जोडप्यांची लेखी संमती आवश्यक असते.

प्रश्न : Surrogate Mother किंवा ‘सरोगसी’ म्हणजे काय?
डॉक्टर :
एखाद्या स्त्रीला जन्मतःच गर्भपिशवी नसेल किंवा काही कारणांनी काढून टाकली असेल अथवा काही दोष असेल तर या मार्गाचा अवलंब केला जातो. पत्नीच्याच अंडाशयात अंडी तयार करून पतीचे शुक्रजंतू वापरून गर्भ तयार होतो तो दुसऱ्या स्त्रीच्या गर्भशयात वाढवला जातो. अशा प्रकारे पती आणि पत्नीचे गुणसूत्र असलेला गर्भ हा दुसऱ्या आईच्या पोटात वाढवून पत्नीला बाळ दिले जाते. जी स्त्री हा गर्भ वाढवते तिला Surrogate Mother म्हणतात.

प्रश्न : ‘सरोगसी’ कोणामध्ये करावी ?
डॉक्टर :
खालील स्थितीमध्ये सरोगसी अवलंबावी लागते,
1) स्त्रीच्या शरीरात गर्भपिशवी नसणे ( उदाहरणार्थ काही कारणांमुळे गर्भपिशवी काढून टाकल्यास किंवा जन्मतः गर्भपिशवी नसल्यास )
2) अविकसित गर्भ पिशवी
3) गर्भपिशवीतील आतील भाग ( अस्तर किंवा गादी ) खराब असल्यास
4) एखादी स्त्री काही आजारांमुळे गर्भधारणेसाठी सक्षम नसल्यास
5) वारंवार होणारा गर्भपात
6) वारंवार टेस्ट टयूब बेबीची प्रक्रिया करूनही गर्भधारणा न झाल्यास सरोगसी अवलंबावी लागते.

प्रश्न : टेस्ट टयूब बेबी केली म्हणजे 100% गर्भधारणा होते ?
डॉक्टर :
नाही, जगात टेस्ट टयूब बेबींचा यशस्वी होण्याचा दर 50% आहे आणि यशस्वी होण्याचा दर बऱ्याच गोष्टीवर ठरलेला आहे, जसे- वंध्यत्वाचे कारण, स्त्रीचे वय , शुक्रजंतूची प्रत, भ्रूण तयार करण्यासाठी वापरलेली औषधी, भ्रूण सोडल्यानंतर वापरात येणारी औषधी व जेथे भ्रूण तयार करण्यात येतो त्या लॅबची रचना व क्वालिटी इत्यादी.

Test tube baby info marathi is another name for IVF procedure, where sperm and eggs are collected, fertilized in the laboratory and the resulting healthy embryo. IVF / Test tube baby information in Marathi. Infertility treatment info in Marathi, IVF, Test tube baby information in Marathi.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.