Fertility Treatments in Marathi, Infertility Causes, Treatment option in Marathi.

वंध्यत्व निवारण आधुनिक उपचार :

अनेकदा करिअर, उच्च राहणीमान मिळविण्याच्या धावपळीत वय वाढत जाते आणि नंतर दांपत्य डॉक्‍टरांकडे बऱ्याचं उशीराने धाव घेतात. इच्छा असुनही 3-4 वर्षात मुल होत नसल्यास पती-पत्नीने चाचण्या करून घेणे आवश्‍यक आहे. बहुतांश दांपत्यांना समुपदेशन व योग्य सल्ला दिल्यानंतर मूल होण्यास मदत होते. वंध्यत्त्व हे केवळ स्त्रीमध्ये नव्हे, तर पुरुषांमध्येही असते. मुले होत नाहीत, म्हणून बऱ्याचदा स्त्रीला दोषी ठरवले जाते. वंध्यत्त्वावर मात करण्यासाठी पती-पत्नीने परस्परांसंबंधी प्रेम, विश्वास ठेवणे आवश्‍यक आहे. शिवाय सकारात्मक मानसिकता आणि कौटुंबिक पाठबळ असले पाहिजे.

आधुनिक वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अशा अनेक दाम्पत्यांच्या वाटय़ाला आज अपत्यप्राप्तीचा आनंद आला आहे किंवा येण्याची आशा निर्माण झाली आहे. वंध्यत्व निवारण करणाऱ्या आधुनिक उपचारांविषयी येथे माहिती करून दिली आहे.

ट्युबोप्लास्टी (Tuboplasty) :
गर्भनलिका बंद असल्यामुळे होणाऱ्या वंध्यत्व निराकरणासाठी उपयोगी. ट्युबोप्लास्टीलाच “रिकॅनलायझेशन ऑफ फॅलोपिअन ट्यूब’ असेही म्हणतात. “फॅलोपिअन ट्यूब’ गर्भपिशवीत स्त्रीबीज वाहून आणण्याचे कार्य करते. गर्भनलिका कुठे, किती ठिकाणी व कशामुळं बंद आहेत यावर उपाययोजना करणं जास्त श्रेयस्कर ठरतं. ट्युबोप्लास्टीत ऑपरेशन करून गर्भनलिकेतील दोष दूर केला जातो. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व विशेष यंत्र तंत्राच्या सहाय्यानं मायक्रोसर्जरी केली तर यशाच प्रमाण खूपच वाढतं. ट्युबोप्लास्टी ही वंध्यत्वावर मात करणारी छोटी शस्त्रक्रियाच होय. यामुळे वंध्यत्वावर मात शक्य होते. टेलीस्कोप (व्हिडीओ लॅप्रोस्कोप)च्या सहाय्याने हे ऑपरेशन केलं जातं. या शस्त्रक्रियेत कोणत्याही प्रकारे कट केलं जात नाही.

लॅप्रोटॉमी (Laparotomy) :
यात उदराला छेद दिला जातो आणि मग शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली, तर पुढच्या सहा ते 12 महिन्यात गर्भधारणा होऊ शकते. पण, या प्रक्रियेत यश आलं नाही, तर आयव्हीएफचाच पर्याय आहे. अर्थात, यासाठी आधी तुमच्या पतीच्या वीर्याची तपासणी करण्यात येईल. या तपासणीचे रिझल्ट सामान्य आले तर नैसगिर्क पद्धतीने गर्भधारणा करता येईल.

प्रेग्नन्सी पुस्तक डाऊनलोड करा..
'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती दिली आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

टेस्ट ट्यूब बेबी (IVF) :
Test tube baby, IVF in Marathi
टेस्ट ट्यूब पद्धतीने यात गर्भधारणा केली जाते. यामध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 व्या दिवसापासून इंजेक्शन सुरू होतात जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात मध्ये एक पाळी येते आणि दुसऱ्या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरू करतात. पाळीच्या 9 व्या दिवसापासून Follicular Study करून अंडाशयातील Follicules वाढ 18 मी. मी. पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून सुईने बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर कोणतीही शस्त्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली अंडी आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर लॅबमध्ये मीलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ Incubator मध्ये 2-3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रूजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते. या प्रक्रियेचा सक्सेस रेटही चांगला आहे. काही जणांमध्ये पहिल्याच फटक्यात ही प्रक्रिया यशस्वी होते, तर काही जणांमध्ये तीन चार वेळा प्रयत्न करावे लागतात.

IUI प्रक्रिया :
पतीच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असली तरी IUI ( Intra uterine Insemination) या पध्दतीमुळे फायदा होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. यामध्ये गर्भपिशवीच्या आतमध्ये पतीचे वीर्य Canula ने सोडले जाते. स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गोळ्या अथवा इंजेक्शन देऊन अंडाशयात अंडी तयार करतात. त्याचे Follicular Study करून 36 तासानंतर IUI केले जाते.

ICSI प्रक्रिया :
ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या अतिशय कमी आहे त्या जोडप्यासाठी ICSI (Intra Cytoplasmic Sperm Injection) याचा उपयोग होतो. या प्रकारात IVF सारखीच प्रक्रिया असते. फक्त शुक्रजंतू हे बीजांडावर न सोडता आतमध्ये इंजेक्शनने सोडतात. शुक्रजंतूंची संख्या चांगली असेल तर या प्रक्रियेची आवश्यकता नसते.

Embryo Donation :
पती आणि पत्नी या दोघांमध्ये कमतरता असेल शुक्रजंतू आणि बीजांड दोन्ही तयार होत नसतील तर दुसऱ्या जोडप्यांचे गर्भ संबंधित स्त्रीच्या गर्भ पिशवीत सोडले जातात. यामुळे स्त्री गर्भवती राहू शकते. या प्रकारात दोन्ही जोडप्यांची लेखी संमती आवश्यक असते.

‘सरोगसी’ Surrogate Mother :
एखाद्या स्त्रीला जन्मतःच गर्भपिशवी नसेल किंवा काही कारणांनी काढून टाकली असेल अथवा काही दोष असेल तर या मार्गाचा अवलंब केला जातो. पत्नीच्याच अंडाशयात अंडी तयार करून पतीचे शुक्रजंतू वापरून गर्भ तयार होतो तो दुसऱ्या स्त्रीच्या गर्भशयात वाढवला जातो. अशा प्रकारे पती आणि पत्नीचे गुणसूत्र असलेला गर्भ हा दुसऱ्या आईच्या पोटात वाढवून पत्नीला बाळ दिले जाते. जी स्त्री हा गर्भ वाढवते तिला Surrogate Mother म्हणतात.

हे करू नका..
आज विज्ञानाने आरोग्य क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. त्यामुळे तुम्हाला मूल हवं तर यासाठी अनेक अत्याधुनिक पर्याय उपलब्ध आहेत.
मुल होण्यासाठी कोणत्याही खोट्या जाहिरातींना फसू नका, आपल्या समस्येचा ‘फायदा’ घेण्यासाठी अनेकांनी पावलो-पावली बाझार मांडला आहे. तज्ञ डॉक्टरांकडूनचं उपचार करून घ्या.

मूल होण्यासाठी कोणत्याही अंधश्रद्येपोठी भोंदू साधू, मांत्रिक, हकिम यांच्याकडून अघोरी उपचार करून घेऊ नका. यामुळे आपला वेळ आणि पैसा विनाकारण खर्च होतो. शेवटी पश्चातापाशिवाय काहीही उरत नाही.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

मुल होण्यासाठी देवावर निक्ष्चित विश्वास ठेवा. तेवढी सकारात्मक उर्जा अपणास त्या श्रद्येतून मिळेल. पण एक लक्षात ठेवा, देवही योग्य प्रयन्न करणाऱ्यांनाचं मदत करत असतो. देवावर विश्वास ठेवल्याने तुमच मनोबल वाढते. पण फक्त प्रार्थतेने किंवा अंधविश्वास ठेऊन आपण शाररीक कमतरतेवर मात करू शकत नाही. जसे की, शुक्रजंतू अजिबात नसणे किंवा स्रीयांच्या दोन्हीही गर्भनलिका बंद असणे वैगैरे. यासाठी योग्य उपचारांचीच अवश्यकता असते.

वंध्यत्व संबंधित खालील माहितीही वाचा..
स्त्री वंध्यत्व कारणे व उपचार
पुरुष वंध्यत्व कारणे व उपचार
टेस्ट ट्यूब बेबी – IVF मराठीत माहिती
वंध्यत्व तपासणी कशी करतात
महिलांमधील वंध्यत्व आणि ‘पीसीओएस’ ची समस्या

Infertility treatments information in Marathi, IVF Test tube baby in Marathi.