मूळव्याध कसा ओळखावा?
शौचाच्या ठिकाणी कोणताही त्रास जाणवू लागल्यास मूळव्याधचा त्रास असल्याचे प्रत्येकाला वाटते. मात्र गुदभागाचे अनेक आजार आहेत. त्यामुळे मूळव्याध कसा ओळखावा याची माहिती याठिकाणी दिली आहे.
लक्षणांवरून मूळव्याध असा ओळखावा –
- मूळव्याधीचा त्रासात गुदाच्या ठिकाणच्या शिरा सुजतात व तेथे वेदना होऊ लागते.
- त्याठिकाणी कोंब किंवा मोड, गाठी येतात.
मलविसर्जन करताना संडासच्या वेळी जास्त दुखू लागते. - गुदभागी खाज, जळजळ व आग होते. तर कधीकधी शौचावाटे रक्तही पडत असते. अशी सर्व लक्षणे मूळव्याधमध्ये असतात.
ह्या लक्षणांवरून मूळव्याध ओळखण्यास मदत होते.
मुळव्याध अंतर्गत आणि बाह्य अशी दोन प्रकारची असते. गुदद्वाराच्या आतील भागामध्ये होणाऱ्या मूळव्याधमध्ये गुदाच्या प्रभावित झालेल्या शिरा सुजतात त्यामुळे त्याठिकाणी वेदना जास्त जाणवते. यामध्ये शौचासोबत रक्त पडू शकते.
तर गुदद्वाराच्या बाहेरच्या भागामध्ये होणाऱ्या मूळव्याधमध्ये कोंब, मांसल गाठी निर्माण होतात. ह्या प्रकारचे रुग्ण जास्त असतात. यामध्येही मूळव्याधच्या ठिकाणी वेदना, आग होणे, खाज येणे, रक्तस्राव होणे अशी लक्षणे असू शकतात. मूळव्याधविषयी माहिती व प्रभावी औषध उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मूळव्याध झाली असल्यास हे करा उपाय :
- सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खावे.
- चमचाभर जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे.
- मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे.
- आहारात सुरण व ताक यांचा समावेश करावा.
- मूळव्याधमध्ये रक्त जात असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर दिवसातून तीन वेळा खावी.
- पोट साफ होत नसल्यास चमचाभर साजूक तूप झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट पाण्यातून घ्यावे.
हे सुद्धा वाचा..
मूळव्याधवरील प्रभावी औषध उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
How to identify piles, get information in Marathi. This Health article written by Doctor Satish Upalkar.