किडनीत मुतखडा कसा तयार होतो याविषयी माहिती जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

How Kidney Stones Form Marathi information.

मुतखडा (किडनी स्टोन) :

बर्‍याच लोकांमध्ये मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या असते. आपली बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. याठिकाणी किडनीत मुतखडा का व कशामुळे तयार होतो आणि त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली आहे.

मुतखडा कसा तयार होतो..?

शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे मुतखडा होत असतो. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत क्षार, युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.

हाय प्रोटीनयुक्त पदार्थ, खारट पदार्थ, कॅल्शियमचे पदार्थ अधिक खाण्यामुळे मुतखडे होऊ शकतात. व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियमची औषधे गोळ्या अधिककाळ घेत राहिल्याने लघवीत कॅल्शियमची पातळी वाढू शकते.

किडनी स्टोन किंवा मुतखडा होण्यास खालील घटक कारणीभूत असतात.
• ‎कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे.
• आहारात प्रोटीन्स आणि सोडियम व कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यास किडनीमध्ये खनिज क्षार जमा झाल्याने मुतखडे निर्माण होतात.
• ‎विहीर किंवा बोरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरल्याने.
• ‎लघवी बराच वेळ मुत्राशयात रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे.
• ‎लघवीतील जिवाणू संक्रमनामुळे (बॅक्टेरियल इन्फेक्शनममुळे).
• ‎तसेच कुटूंबात किडनी स्टोनचा त्रास असल्यास अनुवंशिकतेमुळेही मुतखडा होण्याचा त्रास होऊ शकतो,

मुतखड्याच्या त्रासात पाठीत, ओटीपोटात अतिशय वेदना होतात. लघवी करताना त्रास व जळजळ होते, लघवीत रक्त येणे, लघवी थुंबून राहिल्यास मळमळ व उलट्या होणे हे त्रास मुतखड्यात असतात.

मुतखडा झाल्यास काय करावे..?

• दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे लघवीवाटे मुतखडे निघून जाण्यास मदत होते.
• दररोज चमचाभर लिंबाच्या रसात एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळून हे मिश्रण प्यावे.
• दररोज तुळशीचा रस किंवा पाने चावून खल्यानेही किडनी स्टोन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
• सकाळी उपाशीपोटी कांद्याचा रस प्यावा. याच्या नियमित सेवनाने मुतखडे बारीक होऊन लघवीवाटे बाहेर पडतात.
• डाळींबाचा रस किंवा शहाळ्याचे पाणी पिणेही किडनी स्टोनवर उपयोगी असते.