कुळीथ डाळीतील पोषकघटक :
कुळीथ हे तुरट गोड चवीचे असून रुक्ष, उष्ण आहे. उत्तम मूत्रल असल्याने मुतखडे या विकारामध्ये अत्यंत लाभदायक आहे. मुतखड्याचा त्रास असणाऱयांनी कुळथाचे कढण दररोज सेवन करावे. चरबी कमी करण्यासाठी, पुरुषांतील शुक्रासंबंधी समस्या, स्त्रीयांमधील अंगावरून पांढरे जाणे याविकारांवर कुळीथ विशेष लाभदायी ठरते.
कुळथातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम कुळथातून मिळणारी पोषणतत्वे
कॅलरी | 321 |
प्रथिने | 22 ग्रॅम |
स्नेह पदार्थ | 0.5 ग्रॅम |
कर्बोदके | 57.1 ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | 5 ग्रॅम |
खनिजे | 3 ग्रॅम |
कॅल्शियम | 287 मि. ग्रॅम |
लोह | 8 मि. ग्रॅम |
फॉस्फरस | 311 मि. ग्रॅम |
जीवनसत्व ब-1 | 0.42 |
हे सुद्धा वाचा..
मूगडाळीतील पोषणतत्वे
तूरडाळीतील पोषणतत्वे
हरभरा डाळीतील पोषणतत्वे
उडदातील पोषणतत्वे
Kulith daal nutrient content in Marathi.