पांढरे केस काळे होण्यासाठी हे करा घरगुती उपाय..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

पांढरे केस काळे होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे..?

वयानुसार केस पांढरे होणे हे सामान्य आहे. पण आजकाल बरेच तरुण-तरणीही पांढरे केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. अयोग्य आहार, ताणतणाव, प्रदूषण, रासायनिक हेअर प्रोडक्टचा अतिवापर, मेलेनिनची कमतरता अशा अनेक कारणांनी कमी वयात केस पांढरे होत असतात. यासाठी येथे पांढरे केस काळे करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत याविषयी माहिती सांगितली आहे. यामुळे आपले केस काळे होण्यास मदत होईल.

पांढरे केस काळे करण्यासाठी हे करा घरगुती उपाय..

कडीपत्ता –
कडीपत्ता खोबऱ्याच्या तेलात घालून ते उकळावे. तयार केलेले तेल रोज रात्री आपल्या केसांना लावून मसाज करावा. या घरगुती उपायामुळे पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते.

भृंगराज –
भृंगराज किंवा माक्यापासून बनवलेले तेल केसांना लावून मसाज करावा. या घरगुती उपायामुळेही केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

चहापावडर –
चहा, कॉफी किंवा ब्लॅक टीच्या चोथा पांढरे झालेल्या केसांवर चोळावा आणि थोड्या वेळाने केस धुवावेत. पांढरे केस काळे होण्यासाठी या घरगुती उपायाने मदत होते.

कांदा –
कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यात लिंबाचा रस घालावा. ही तयार केलेली पेस्ट केसांना लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवावेत. या घरगुती नैसर्गिक उपयाचाही पांढरे केस काळे होण्यास चांगला उपयोग होतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

आवळा –
आवळा पावडर किंवा आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करुन तेलात उकळवावेत. या तेलाने केसांना दररोज रात्री मालिश करावी.

कोरफड –
कोरफडीचा गर काढून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण केसांना लावावे. काही वेळानंतर केस धुवून टाकावेत. हा घरगुती उपाय केल्यानेही आपले केस काळे होण्यास मदत होईल.

Home remedies for White hair tips in Marathi.