एडस् विषयी मराठी माहिती जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

एडस् (AIDS) :

या रोगामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते. म्हणून त्याला Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS) असे म्हणतात.

रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने रुग्ण शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्याही दुर्बल बनतो. अशी व्यक्ती साधारण ताप, सर्दि, खोकला यासारखे विकारही सहन करु शकत नाही. एडस् हा एक अत्यंत घातक असा संसर्गजन्य विकार असून तो HIV (ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस) पासून पसरत असतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

एडस् कसा पसरतो –
• एडस् रोग हा HIV विषाणूच्या संसर्गामुळे होत असतो.
• ज्या रुग्णाला एडस् रोग झाला आहे किंवा ज्याच्या शरीरात एडसचे विषाणू आहेत पण अद्याप ज्याच्यामध्ये स्पष्ट लक्षणे उत्पन्न झाली नाहीत अशा HIV बाधीत व्यक्तींशी लैंगिक संबंध स्थापित केल्याने, तसेच त्यांचे रक्त एकाद्यास चढवल्याने तसेच एडस् ची लागण होत असते.
• HIV संक्रमित सुई, इंजेक्शनांमार्फत एडस् ची लागण होत असते,
• असुरक्षीत यौणसंबंध, समलैंगिक संबंध, वेश्यागमण ह्या प्रवृत्तीमुळेही एडस् ची लागण होत असते.
• एडस् बाधीत मातेकडून गर्भस्थ शिशुमध्ये एडस् ची लागण होत असते.
• एडस् बाधीत व्यक्तीच्या रक्त, वीर्य, लघवी, लाळ, थुंकी यांच्या संपर्कात आल्यामुळे एडस् ची लागण होत असते.

एडस् लक्षणे –
• रोगप्रतिकार शक्ती कमी होणे,
• थकवा येणे,
• हळूहळू वजन कमी होत जाणे,
• शरीर खंगत जाणे,
• अधिक काळापर्यंत अतिसार होणे,
• मांसपेशी दुर्बल बनतात,
• बारीक ताप येणे,
• रात्री अत्यधिक घाम येणे,
• भुक मंदावणे ही लक्षणे आढळू शकतात.

प्रतिबंधात्मक उपाय –
एडस् रोगावर निश्चित असा उपचार नसल्याने त्यापासून बचाव करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
• असुरक्षीत यौणसंबंध, वेश्यागमन आणि समलैंगिकता यासारख्या प्रवृत्तीपासून दूरच राहणे गरजेचे आहे.
• रक्त घेण्यापुर्वी ते HIV संक्रमित नसल्याची खात्री करुन घ्यावी.
• दुषित सुया, इंजेक्शन यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. इंजेक्शन घेताना प्रत्येक रुग्णाने सतर्कता दाखवावी.
• मादक द्रव्यांचे सेवन करु नये.