उच्च रक्तदाब – High blood pressure :

उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशरची समस्या अनेकजणांना असते. वारंवार रक्तदाब हा 130/80 mm Hg पेक्षा जास्त दिसत आल्यास हाय ब्लडप्रेशरची समस्या असल्याचे स्पष्ट होते. रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. योग्य आहार घेतल्यास रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास खूप मदत होते. यासाठी येथे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती दिली आहे.

उच्च रक्तदाब आणि आहार पथ्य –

उच्च रक्तदाब असल्यास आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा समावेश करावा. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी लसूण, कांदा, आले, लिंबू, बदाम यांचा समावेश आहारात करावा. दररोज दोन लसूण पाकळ्या चावून खाव्यात. तसेच आल्याचा तुकडाही चावून खाऊ शकता.

रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी काय खावे..?
हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास सोडिअमचे प्रमाण कमी करून तर पोटॅशियम असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. दूध, दही, केळी , जर्दाळू, एवोकॅडो, संत्री, मनुका, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, पालक, मासे अशा अनेक पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब असल्यास वरील पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.

तसेच दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, रक्तातील अशुद्धी दूर होते, लघवीस साफ होऊन किडनीचे आरोग्यही चांगले राहते पर्यायाने रक्तदाब आटोक्यात राहतो.

हाय ब्लड प्रेशर असल्यास काय खाऊ नये..?
हाय ब्लड प्रेशरमध्ये चरबीजन्य पदार्थ, तेला-तुपाचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, खारट पदार्थ, लोणची, पापड, मैद्याचे पदार्थ, साखरेचे पदार्थ खाऊ नये. चहा, कॉफीही वारंवार पिणे टाळावे. वरील पदार्थांमुळे अधिक वजन वाढत असते.

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास मीठाचे प्रमाण कमी करावे. एका दिवसामध्ये 2.3 gm (2300 mg) पेक्षा अधिक मिठाचे (सोडियमचे) सेवन करू नये. यासाठी जेवनाव्यतिरिक्त खाद्य पदार्थांच्या पाकीटावरील सोडियमचे प्रमाणही तपासावे. यापेक्षा आहारात सैंधव मिठाचा वापर सुरू करावा.

हाय बीपी असल्यास विविध प्रकारच्या व्यसनांपासूनही दूर राहावे. कारण मद्यपान, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्याबरोबरच हाय ब्लडप्रेशरची समस्याही होत असते. हाय ब्लडप्रेशर असल्यास सिगारेटचे व्यसन करणे अत्यंत धोकादायक असून यामुळे हार्ट अटॅक, लकवा याचा धोका वाढतो. यासाठी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी व्यसन करणे ठाळावे.

हे देखील वाचा – डायबेटिस रुग्णांचा आहार कसा असावा ते जाणून घ्या.

Read Marathi language article about High blood pressure diet plan. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.