हिपाटायटिस होऊ नये यासाठी घ्यावची काळजी

617
views

हिपाटायटिस होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :
हिपाटायटिस A, B चे Vaccine लसींद्वारे रक्षण होते.

तसेच खालील प्रतिबंदात्मक उपाय योजावे –
◦ स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात.
◦ बाहेरुन आल्यावर, मल-मुत्र त्यागानंतर हात, पाय, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावेत.
◦ उघड्यावरील पदार्थ, दुषित आहार, शिळे पदार्थ, कच्चे मांस-मासे खाऊ नयेत.
◦ दुषित पाणी पिणे टाळावेत. पाणी गरम करुन, निर्जंतुक करुन घ्यावी.
◦ पावसाळ्याच्या दिवसात पाण्याविषयी विशेष खबरदारी घ्यावी.
◦ दुसऱयाच्या स्वच्छता साधनांचा वापर करु नये. उदा. दुसऱयाचा साबन, कपडे, टुथब्रश, रेझर्स, नेलकटर्स इ. वस्तु वापरु नये.
◦ मद्यपान, धुम्रपान करणे टाळावे. व्यसनांमुळे विविध विषारी घटक शरीरात जात असतात.
◦ असुरक्षीत लैंगिक संबंध टाळावेत. वेश्यागमन, समलैंगिकता, गुदामैथुन यासरख्या विकृत- अनैतिक गोष्टींपासून दूर रहावे.
◦ रक्त घेताना किंवा अवयव प्रत्यारोपनावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी विशेष दक्ष रहावे. रक्त, अवयव हे हिपाटायटिस बाधीत नसल्याची खात्री करुन घ्यावी.
◦ वापरलेल्या सलाइन्स, इंजेक्शन. सुया यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. वैद्यकीय कचऱयापासून दुर रहावे.
◦ रुग्णांची सुश्रृषा करणाऱयांनी, नर्स इ. विशेष दक्षता घ्यावी.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.