हिपाटायटिस कोणकोणत्या कारणांमुळे होतो

762
views

हिपाटायटिस कारणे :
हिपाटायटिसच्या प्रकारानुसार वेगवेगळी कारणे असतात.

[1] हिपाटायटिस A ची कारणे –
हिपाटायटिस ‘ए’ मुळे संदुषित आहार, पाण्याचे सेवन केल्याने हिपाटायटिस ‘ए’ चा प्रसार होत असतो.

[2] हिपाटायटिस B ची कारणे –
हिपाटायटिस ‘बी’ बाधीत व्यक्तीच्या रक्त, थुंकी, लाळ, मल, मुत्र, वीर्य, लैंगिक संबंधातून याचा प्रसार होत असतो. हिपाटायटिस ‘बी’ बाधीत गर्भीणीद्वारे नवजात बालकामध्ये प्रसार होत असतो.

[3] हिपाटायटिस C ची कारणे –
हिपाटायटिस ‘सी’ बाधीत व्यक्तीच्या रक्तदानातून, अवयव प्रत्यारोपनामुळे याचा प्रसार होत असतो. तसेच हिपाटायटिस ‘सी’ बाधीत व्यक्तीच्या स्वच्छता साधणांचा जसे, साबण, टुथब्रश, टॉवेल, कपडे, रेझर्स इ. चा वापर केल्यास याचा संसर्ग होतो आणि हिपाटायटिस ‘सी’ उत्पन्न होतो.

[4] हिपाटायटिस D ची कारणे –
हिपाटायटीस ‘डी’ बाधीत रुग्णाच्या दुषित सुई, इंजेक्शनद्वारे तसेच बाधीत व्यक्तिच्या लैंगिक संबंधातून याचा संसर्ग होत असतो.

इतर विविध संसर्गजन्य रोगांची माहितीसुध्दा वाचा :
खालील सर्व प्रमुख संसर्गजन्य रोगांची माहिती मराठीमध्ये हवी असल्यास येथे क्लिक करा..
डेंग्‍यू ताप, मलेरिया, चिकुनगुन्‍या, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, निपाह वायरस, गोवर, वाऱ्याफोड्या, जर्मन गोवर, कांजिण्या, नागीण, काविळ, हिपॅटायटीस, टायफॉईड, गालफुगी, टॉन्सिल्स सुजणे, डांग्या खोकला, न्यूमोनिया, घटसर्प, क्षयरोग TB, कुष्ठरोग, एड्स HIV यासारख्या सर्व प्रमुख संसर्गजन्य रोगांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

[5] हिपाटायटिस E ची कारणे –
अविकसनशील गरीब देशांमध्ये हिपाटायटिस ‘ई’ चे प्रमाण अधिक आहे.
दुषित आहार, दुषित पाणी, स्वच्छतेचा अभाव यातून हिपाटायटिस ‘ई’ चा प्रसार होत असतो.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.