छातीत जळजळणे – Heartburn :

आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. प्रामुख्याने पित्त वाढवणाऱ्या आहारामुळे हा त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व योग्य आहार, पुरेशी झोप घेतल्यास छातीत जळजळण्याची समस्या निश्चितच दूर होईल.

जेव्हा पोटात आम्ल हे अन्ननलिकेत ढकलले जाते, त्यावेळी छातीत जळजळ होऊ लागते. यावेळी छातीत जळजळ होण्याबरोबरच आंबट ढेकर येणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ होणे असे त्रास व लक्षणे यावेळी जाणवू शकतात. बहुसंख्य लोकांमध्ये छातीत जळजळणे हे एक सामान्य बाब असू शकते. तर साधारण 20-40% लोकांमध्ये गॅस्ट्रोइस्फॅगल रिफ्लक्स डिसीज (GERD) यामुळेही छातीत जळजळू शकते. ह्या स्थितीमध्ये जास्त काळजी घेणे आवश्यक असते.

छातीत जळजळ होण्याची कारणे :

  • जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
  • चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे,
  • अधिक वेळ उपाशी राहिल्याने,
  • जेवणाच्या वेळा न पाळणे,
  • धूम्रपान, तंबाखू, मद्यपान अशी व्यसने करणे,
  • मानसिक ताणतणाव,
  • जागरण करणे,
  • डोकेदुखी व अंगदुखीच्या गोळ्या वरचेवर घेणे,
    अशा विविध कारणांनी पोटातील आम्लाचे प्रमाण वाढून छातीत जळजळ होत असते.

छातीत जळजळ होत असल्यास हे घरगुती उपाय करावे :

आले –
छातीत जळजळत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे छातीतील जळजळ कमी होऊन आराम पडतो.

थंड दूध –
छातीत जळजळणे यावर थंड दूध पिणे उपयुक्त ठरते. तसेच दुधात मनुका घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात. छातीतील जळजळ दूर होते.

केळे –
केळ्यात नैसर्गिकरीत्या Antacids असतात. त्यामुळे छातीमध्ये जळजळ होत असल्यास केळे खाल्याने आराम मिळतो.

बडीशेप –
जेवणानंतर बडीशेप चावून खाल्यामुळे छातीत जळजळ होत नाही. तसेच यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होते.

तुळशीची पाने –
छातीत जळजळ होत असल्यास तुळशीची काही पाने चावून खावीत. यामुळे जळजळ थांबते.

छातीत जळजळत असल्यास लिंबूपाणी प्यावे की नाही..?

पित्तामुळे छातीत जळजळू लागल्यास अनेकजण लिंबाचा रस किंवा लिंबूपाणी पितात. मात्र अशावेळी लिंबूरस पिण्यामुळे पोटातील आम्ल अधिक वाढून त्रास वाढू शकतो. त्यामुळे छातीत जलन होत असल्यास लिंबूपाणी पिऊ नये. त्याचप्रमाणे सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.

छातीमध्ये जळजळ होऊ नये यासाठी काय करावे..?

छातीत जळजळ होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.

  • एकावेळी भरपेट जेवणे टाळावे.
  • जेवणाच्या वेळा पाळा.
  • मसालेदार पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, लोणची, कच्चा टोमॅटो, कच्चा कांदा, ओलं खोबरं, पापड, अति मांसाहार, हरभऱ्याची डाळ हे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत.
  • चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स वारंवार पिणे टाळा.
  • मद्यपान, धूम्रपान, तंबाखू ही व्यसने करणे टाळा.
  • पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
  • नियमित व्यायाम करावा.
  • मानसिक ताण घेऊ नये.
  • रात्री न जागणे व दिवसा न झोपणे.
  • डाव्या कुशीवर झोपावे.
  • वारंवार वेदनाशामक गोळ्या खाणे टाळावे.

हे सुद्धा वाचा – पित्ताचा त्रास होणे यावरील उपाय जाणून घ्या.

Read Marathi language article about Heartburn Causes, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *